शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांचे निधन

By admin | Updated: June 11, 2015 00:48 IST

माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांचे मंगळवारी येथे दीर्घ आजाराने ७२व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि हृषीकेश व आदित्य ही मुले आहेत.

पुणे : माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांचे मंगळवारी येथे दीर्घ आजाराने ७२व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि हृषीकेश व आदित्य ही मुले आहेत.कानिटकरांनी यष्टिरक्षक आणि आघाडीचे फलंदाज म्हणून भारतातर्फे दोन कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. १९६३-६४मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यातच कानिटकर यांनी सौराष्ट्राविरुद्ध शतक झळकावले होते. रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा मान त्यांनी दोन वेळा पटकावला. १९७०-७१च्या रणजी स्पर्धेत कानिटकरांच्या खेळामुळे महाराष्ट्राने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. त्यामुळे मायदेशातील वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले होते. वेस्ट इंडीजविरुद्ध १९७४-७५मध्ये त्यांनी दोन कसोटी सामने खेळले होते. बंगळुरू येथे पदार्पणाच्या कसोटीत क्लाईव्ह लॉईड यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विंडीज संघात लान्स गिब्ज, अँडी रॉबटर््ससारखे दर्जेदार गोलंदाज असताना कानिटकर यांनी ६५ धावांची झुंजार खेळी केली होती. त्यानंतरच्या तीन डावांमध्ये मात्र त्यांना फारसे यश आले नाही. १९६३मध्ये त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९७८पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. जवळपास दीड दशकाच्या कारकिर्दीत कानिटकर यांनी ४२.७९च्या सरासरीने ५,००७ धावा केल्या. यात १३ शतकांचा समावेश आहे. त्यांचा मुलगा हृषीकेश कानिटकर यानेही दोन कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचा दुसरा मुलगा आदित्य हा गोल्फ प्रशिक्षक आहे. (क्रीडा प्रतिनिधी)