शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 10:27 IST

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे.

Sania Mirza Post : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. तेव्हापासून सानिया चर्चेत आहे. तिच्या या नात्याबद्दल सानियाने जाहीरपणे भाष्य करणे टाळले आहे. पण ती वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून नकळत याचे संकेत देत असते. आता तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवत प्रेरणादायी मेसेज दिला आहे. सानिया मिर्झानेटेनिस खेळात भारताला एक ओळख निर्माण करून दिली. पण २०१० मध्ये तिला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले होते. हा तो काळ होता जेव्हा सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले होते.

खरे तर पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे. शोएब आणि सानिया यांना एक मुलगा देखील आहे. शोएब आणि सानिया यांच्यातील हे नाते १४ वर्षांनंतर संपले. सानिया तिचा मुलगा इझान मिर्झा मलिकसोबत दुबईमध्ये शोएबपासून लांब राहत आहे. शोएबची तिसरी पत्नी सना जावेद हिचे देखील या आधी लग्न झाले आहे. सना तिच्या पडद्यावरील आयुष्याशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. घटस्फोटानंतर सानिया मिर्झा कधीही उघडपणे काहीच बोलली नाही. मात्र, ती सोशल मीडियावर सक्रिय असून वेगवेगळ्या पोस्ट करत असते.

सानियाची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. तिने एक पोस्ट तिच्या स्टोरीवर ठेवली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून असतो. त्यामुळे संयम ठेवा. सानिया नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते. 

शोएब मलिकचे तिसरे लग्न शोएब मलिकने सानियापासून विभक्त होऊन अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. शोएबची पत्नी सनाचा जन्म २५ मार्च १९९३ रोजी सौदी अरेबिया येथे झाला. कराची विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर तिने २०१२ साली 'शहर-ए-झात' मधून पाकिस्तानी सिनेसृष्टीत पदार्पण केले. काला दोरीया, मुश्त-ए-खाक, डंक, रूसवाई, दार खुदा, आणि इंतजार सारख्या नाटकांमध्ये तिने कमालीची भूमिका साकारली आहे. सनाचे हे पहिले लग्न नसून तिचे याआधीही लग्न झाले आहे. २०२० साली उमैर जसवालसोबत सनाने निकाह केला होता. उमैर हा पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक आहे.

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाTennisटेनिस