शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

'चढउतार आयुष्याचा भाग, पुढे जाण्याआधी ‘रेड सिग्नल’वर थांबलेले बरे'' : सुशील कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:56 IST

तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर मॅटवर पुनरागमन करणारा आॅलिम्पिकचे दुहेरी पदक विजेता मल्ल सुशील कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या पूर्वसंध्येला मनातील बोलला.

इंदूर : तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर मॅटवर पुनरागमन करणारा आॅलिम्पिकचे दुहेरी पदक विजेता मल्ल सुशील कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या पूर्वसंध्येला मनातील बोलला. ‘चढउतार आयुष्याचा भाग असून, पुढे जाण्याआधी रेड सिग्नलवर थांबून प्रतीक्षा करणेदेखील गरजेचे असते,’ असे सुशीलचे मत पडले.गुरू महाबली सतपाल यांचा आदेश मिळताच मॅटवर परतल्याचे सांगून सुशील म्हणाला, ‘माणूस पुढे जातो तेव्हा त्याला चढउताराचा सामना देखील करावा लागतो. तीन वर्षांनंतर मॅटवर परतताना युवा मल्लासारखा अनुभव घेत आहे. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खेळताना मल्ल नवखा असो वा अनुभवी, सर्वांना स्फूर्ती लाभतेच.’भारताला दोनदा आॅलिम्पिक पदक मिळवून देणाºया ३४ वर्षांच्या सुशीलला गेल्या काही वर्षांत बºयाच चढउतारांचा सामना करावा लागला. यासंदर्भात विचारताच तो म्हणाला, ‘यशाची पायरी चढण्याआधी ठेच लागली तर माणूस सावरतो. पुढे जाण्याआधी रेड सिग्नलवर थांबलेले बरे. पुढे कसे जायचे याचा विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. आयुष्यात यश मिळवायचे झाल्यास हाच मंत्र लक्षात ठेवावा लागेल.७४ किलो गटात सुशील रेल्वेतर्फे आज शुक्रवारी मॅटवर उतरणार आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांविषयी विचारताच तो म्हणाला, ‘सध्यातरी मी राष्ट्रीय स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे पुन्हा एकदा देशाचे प्रतिनिधित्व करू शकेन, असा विश्वास वाटतो.’सुशीलने अखेरची कुस्ती २०१४ च्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत खेळली होती. त्या वेळी त्याने सुवर्ण जिंकले. २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमध्ये मात्र त्याला सहभागी होता आले नाही. रेसलिंग फेडरेशन आॅफ इंडियाने रिओ आॅलिम्पिकमध्ये ७४ किलो गटात भारताचे प्रतिनिधित्व कोण करेल यासाठी आधी नरसिंग यादव आणि सुशील यांच्यात निवड चाचणी घेण्याचे ठरविले होते; पण ऐनवेळी शब्द फिरविल्याने सुशीलने न्यायालयातधाव घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाने चाचणीची सुशीलची मागणी फेटाळली होती. (वृत्तसंस्था)सुशील कुमारने पुनरागमनाचा घेतलेला निर्णय पाहून मला खूप आनंद झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची अट सुशील कुमारसाठी अनिवार्य नसेल. आणि आम्ही कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची अट घालणार नाही. दुखापत किंवा वैयक्तिक कारणामुळे कोणीही राष्ट्रीय स्पर्धेपासून दूर राहू शकतो.- ब्रिजभूषण शरण सिंग, अध्यक्ष, भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआय)