शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

ऑलिम्पिकमध्ये जपानचा पहिला विजय; उद्‌घाटन सोहळ्याला १५ देशांच्या नेत्यांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 07:58 IST

उद्‌घाटन सोहळ्यात भारताचे सहा अधिकारी; दुसऱ्या दिवशी सामने खेळणाऱ्यांना‘ नो एंट्री’

टोकियो : वर्षभर उशिरा सुरू झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पहिला विजय यजमान संघाने मिळविला. जपानने महिला सॉफ्टबॉलच्या एकतर्फी लढतीत ऑस्ट्रेलियाचा ८-१ ने पराभव केला. खेळाडू, अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत सामना झाला. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये जपानने अमेरिकेचा पराभव करीत या प्रकाराचे सुवर्ण जिंकले होते.

दरम्यान, उद्‌घाटन सोहळ्यात भारताचे केवळ सहा अधिकारी सहभागी होऊ शकतील, अशी माहिती भारतीय पथकाचे उपप्रमुख प्रेमकुमार वर्मा यांनी दिली. ज्या खेळाडूंना दुसऱ्या दिवशी स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, अशांना उद्‌घाटन सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. भारतीय पथकात १२७ खेळाडू तसेच अधिकारी, कोचेस आणि सपोर्ट स्टाफसह २२८ जणांचा समावेश आहे. मनप्रीत आणि मेरीकोम हे ध्वजवाहक आहेत, मात्र पुरुष हॉकी संघाचा दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध सामना असल्यामुळे कर्णधार मनप्रीत सोहळ्यात सहभागी होऊ शकेल का, याविषयी शंका आहे. प्रत्येक देशाच्या सहा अधिकाऱ्यांना उपस्थितीची परवानगी असल्याचे वर्मा यांनी सांगितले.

उद्‌घाटन सोहळ्याला १५ देशांच्या नेत्यांची हजेरी

- कोरोना सावटात ऑलिम्पिकचे उद्‌घाटन शुक्रवारी होत आहे. उद्‌घाटन सोहळ्याला जवळपास १५ देशांचे नेते उपस्थित राहतील. जपानमधील वृत्तानुसार कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थितांची संख्या केवळ एक हजार इतकी असेल. 

- मुख्य कॅबिनेट सचिवांचा हवाला देत वृत्त एजन्सीने कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

- किमान ७० कॅबिनेट स्तर अधिकारी जपानमध्ये येतील. मिळालेल्या माहितीनुसार फ्रान्सचे राष्ट्रपती, इमान्यूएल मेक्रो, मंगोलियाचे पंतप्रधान लुवसानामसराई, अमेरिकेच्या प्रथम नागरिक महिला झिल बायडेन यांच्यासह काही विश्वस्तरावरील नेते येणार आहेत. 

- याशिवाय कोरोना वाढल्यामुळे अनेक व्हीआयपींनी आपला बेत रद्ददेखील केला. ऑलिम्पिकच्या निमित्ताने जपानचे पंतप्रधान योशिहादे सुगा यांना जागतिक नेत्यांसोबतचे संबंध भक्कम करण्यास मदत होणार आहे. प्रेक्षकांना मात्र स्टेडियममध्ये येण्यास बंदी आहे.

ऑस्ट्रेलियाच्या अश्वारोहकावर बंदी

कोकेन सेवनात पॉझिटिव्ह आढळलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अश्वारोहण पथकातील सदस्य केरमोंड याला तात्पुरते निलंबित करण्यात आले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तो सहभागी होऊ शकणार नाही. मात्र चाचणीचा ब नमुना तपासण्याची त्याला परवानगी असेल. ३६ वर्षांचा केरमोंड यंदा ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार होता.

टोकियोतील तळीराम निराश

- उद्‌घाटनाच्या पूर्वसंध्येला कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी जल्लोष करण्यावर आणि मद्यप्राशनावर बंदी घालण्यात आल्यामुळे स्थानिक तळीराम कमालीचे अस्वस्थ जाणवले. 

- बार आणि रेस्टॉरंट रात्री ८ वाजता बंद होणार आहेत. याचा विपरीत परिणाम जाणवला. 

- अनेकजण आता मोकळ्या जागेत मद्य प्राशन करताना दिसतात. 

- आमच्या देशात ऑलिम्पिक आहे, मात्र आम्ही याचा भाग नाही, याविषयी चीड येत असल्याचे अनेक स्थानिकांचे मत आहे.

खेळाची कोरोनावर मात

कोरोनाची जोखीम पूर्णपणे संपविणे कठीण असले तरी टोकियो ऑलिम्पिकच्या रूपाने खेळाने कोरोनावर मात केल्याची प्रतिक्रिया विश्व आरोग्य संघटनेचे (डब्ल्य  यूएचओ) प्रमुख टेड्रोस एडहानोम गॅब्रेसियस यांनी व्यक्त केली. जपानने महामारीचा यशस्वी सामना केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

ऑलिम्पिक काळात होणार ५००० डोप परीक्षण

ऑलिम्पिक काळात किमान पाच हजार डोप चाचण्या होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय चाचणी समितीने बुधवारी दिली. आयओसीच्या १३८ व्या सत्रात डोपिंग विरोधी कार्यक्रम लागू झाला असल्याचे सांगण्यात आले. २३ जुलै रोजी होणाऱ्या उद्‌घाटनाआधी वाडा आणि आयटीएकडून सर्व अपडेट जाणून घेण्यात आले. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाचा अहवाल चर्चेसाठी पटलावर ठेवण्यात आला. जे खेळाडू दोषी आढळतील त्यांना शिक्षा देण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.आयटीए आणि क्रीडा लवादाचा डोपिंग विरोधी विभाग शिक्षा निश्चित करणार आहे. मागच्या वर्षी ऑलिम्पिक वर्षभर लांबणीवर टाकल्यानंतर आयटीए फाऊंडेशन बोर्डाने सर्व ३३ खेळ आणि त्यातील खेळाडूंचे समीक्षण केले. टोकियो ऑलिम्पिकदरम्यान स्थानिक आयोजन समिती तसेच जपान डोपिंग विरोधी एजन्सीच्या सहकार्याने जवळपास पाच हजार लघवी आणि रक्ताचे नमुने एकत्र करण्याची आमची योजना असल्याची माहिती आयटीए बोर्डाचे अध्यक्ष डाॅ. वालेरी फोरनेरोन यांनी दिली.

२०३२ चे ऑलिम्पिक ब्रिस्बेनमध्ये

ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये २०३२ चे ऑलिम्पिक होणार आहे. आयओसीने बुधवारी याची अधिकृत घोषणा केली. ऑस्ट्रेलियाने याआधी १९५६ आणि २००० ला मेलबोर्न तसेच सिडनी ऑलिम्पिकचे आयोजन केले होते. २०२४ चे ऑलिम्पिक पॅरिसमध्ये तर २०२८ चे ऑलिम्पिक लॉस एंजिलिस शहरात होणार आहे. कतारने देखील २०३२ च्या ऑलिम्पिक आयोजनाची इच्छा व्यक्त केली होती, मात्र हे अधिकार अखेर ब्रिस्बेनने जिंकले.

तायक्वांडो, स्केटबोर्ड खेळाडू पॉझिटिव्ह

चिलीची तायक्वांडोपटू फर्नांडा एग्वायर आणि नेदरलॅन्डची स्केटबोर्ड खेळाडू केंडी जेकब्स या बुधवारी पॉझिटिव्ह आढळताच ऑलिम्पिक बाहेर पडल्या. फर्नांडा ही विमानतळावरील चाचणीत तर केंडी क्रीडाग्राममधील चाचणीत बाधित आढळली. यामुळे कोरोनाबाधित खेळाडूंची संख्या सहा झाली आहे. 

चिलीच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनुसार केंडीने इन्स्टापेजवर लिहिले, ‘माझा स्वप्नभंग झाला. ऑलिम्पिकचा प्रवास थांबला. कोरोनापासून सावध राहण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.’ फर्नांडाच्या ॲन्टिजन आणि आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021