शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
5
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
6
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
7
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
8
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
10
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
11
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न
12
आयेशा खानने मारला मोदक अन् पुरणपोळीवर ताव, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
13
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
14
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
15
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
17
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
18
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
19
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्नाटक विजेतेपदाच्या मार्गावर

By admin | Updated: March 11, 2015 03:37 IST

मधल्या फळीतील फलंदाज करुण नायरने झळकावलेल्या जबरदस्त त्रिशतकाच्या जोरावर कर्नाटकने तब्बल ४८४ धावांची आघाडी घेतली.

मुंबई : मधल्या फळीतील फलंदाज करुण नायरने झळकावलेल्या जबरदस्त त्रिशतकाच्या जोरावर कर्नाटकने तब्बल ४८४ धावांची आघाडी घेतली. नायरच्या जोरावर गतविजेत्या कर्नाटकने रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण राखताना तामिळनाडूच्या आशा जवळजवळ संपुष्टात आणल्या. लोकेश राहुलने ३२० चेंडंूत १८८ धावा चोपल्या. अवघ्या १२ धावांनी त्याचे द्विशतक हुकले. तिसऱ्या दिवसअखेर कर्नाटकने ७ बाद ६१८ धावा केल्या. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात नायरने ५३३ चेंडूंचा सामना करताना तब्बल ४५ चौकार व उत्तुंग षटकार खेचून नाबाद ३१० धावा फटकावल्या. ५ बाद ३२३ या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करताना लोकेश-नायर या नाबाद जोडीने आणखी १४७ धावांची भर घातली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३८६ धावांची भागीदारी करताना तामिळनाडूच्या हातून सामना जवळजवळ हिसकावून घेतला.रंगराजनने १३७व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर लोकेशला झेलबाद करून तामिळनाडूला मोठे यश मिळवून दिले. या वेळी तामिळनाडू कर्नाटकला झटपट गुंडाळणार असे वाटू लागले. मात्र दुसऱ्या बाजूला खंबीरपणे उभ्या असलेल्या नायरच्या मनात वेगळेच होते. लोकेश बाद झाल्याचा कोणताही परिणाम आपल्या खेळीवर होऊ न देता त्याने संघाची धावसंख्या वाढवली. लोकेश-नायर यांनी तिसऱ्या दिवशी ३७.२ षटके फलंदाजी करताना तामिळनाडूचा घाम गाळला.दरम्यान, दिवसभरात फक्त दोन फलंदाज बाद करण्यात यश आलेल्या तामिळनाडूकडून रंगराजन आणि क्रिस्ट यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.