शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

सेरेना, मुगुरुजा यांच्यात अंतिम झुंज

By admin | Updated: June 4, 2016 02:21 IST

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स आणि चौथी मानांकित स्पेनची गरबाईन मुगुरुजा ब्लांको यांच्यात फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत विजेतेपदाची झुंज रंगणार आहे.

पॅरिस : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स आणि चौथी मानांकित स्पेनची गरबाईन मुगुरुजा ब्लांको यांच्यात फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत विजेतेपदाची झुंज रंगणार आहे.अव्वल मानांकित आणि गत चॅम्पियन सेरेनाने संघर्षपूर्ण लढतीत हॉलंडच्या किकी बर्टन्स हिचा ७-६, ६-४ असा पराभव केला, तर मुगुरुजाने जबरदस्त कामगिरी करताना आॅस्ट्रेलियाच्या सामंथा स्टोसूर हिचे आव्हान ६-२, ६-४ असे मोडून काढत प्रथमच फ्रेंच ओपनमध्ये अंतिम फेरीत धडक मारली.फ्रेंच ओपनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक करणारी सेरेना आता जर्मनीची महान खेळाडू स्टेफी ग्राफच्या २२ ग्रॅण्डस्लॅमच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे; परंतु तिला विजेतेपदाच्या लढतीत मुगुरुजा हिचे कडवे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. मुगुरुजाने आतापर्यंत या स्पर्धेत सुरेख कामगिरी केली आहे. मुगुरुजाने प्रथमच फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली. हा तिसरा दुसरा ग्रॅण्डस्लॅम फायनल आहे. गतवर्षी तिला विम्बल्डनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मुगुरुजाने पूर्ण सामन्यात जबरदस्त कामगिरी करताना २१ व्या मानांकित स्टोसूरला डोके वर काढण्याची उसंत मिळू दिली नाही. चौथ्या मानांकित खेळाडूने सामन्यात ९ पैकी पाच ब्रेक गुण घेतले आणि २0 विनर्स मारले. स्टोसूरने पाचपैकी २ ब्रेक गुण मिळविले; परंतु तिने २0 निरर्थक चुका केल्या आणि सहा दुहेरी चुका केल्या आणि हीच बाब तिच्या पराभवास कारणीभूत ठरली. मुगुरुजा १६ वर्षांनंतर फ्रेंच ओपन फायनलमध्ये पोहोचणारी पहिली स्पेनिश खेळाडू बनली आहे. याआधी स्पेनच्या अरांत्सा सांचेझ व्हिकारिओ आणि कोचिंता मार्टिनेज उपांत्य फेरीत आमने-सामने होत्या.सेरेनाला युवा खेळाडू बर्टन्स हिला पराभूत करण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. सेरेनाने पहिला सेट टायब्रेकमध्ये ९-७ असा जिंकला. पहिल्या सेटमध्ये युवा डच खेळाडू सनसनाटी निकाल नोंदवील असेच चिन्ह होते; परंतु येथे २00२, २0१३ आणि २0१५ मध्ये विजेतेपद पटकाविणाऱ्या सेरेनाने आपला अनुभव पणाला लावताना रोमहर्षक अंदाजात टायब्रेक जिंकला.दुसऱ्या सेटमध्येची नाट्यमय सुरुवात झाली आणि सेरेनाने तिची सर्व्हिस गमावल्याने ती 0-२ ने पिछाडीवर पडली; परंतु अमेरिकन खेळाडूने पुन्हा बर्टन्स हिची सर्व्हिस भेदताना मुसंडी मारली. तिने बर्टन्सला उर्वरित आठपैकी फक्त २ गेम जिंकू दिले आणि दुसरा सेट ६-४ ने जिंकताना अंतिम फेरीतील तिकीट पक्के केले.