शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

फिफाचा रंगतदार फिव्हर... मोरोक्कोने बलाढ्य बेल्जियमला नमवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 05:46 IST

अब्देलहमीद, झकारियाचे शानदार गोल

अल थुमामा (कतार) : यंदाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील तिसरा अनपेक्षित निकाल नोंदवताना मोरोक्कोने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बलाढ्य बेल्जियमला २-० असे नमवले. यासह मोरोक्कोने सर्वाधिक ४ गुणांसह ‘फ’ गटात अव्वल स्थान पटकावले. मोरोक्कोने सलामीला क्रोएशियाला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. बेल्जियमने कॅनडाला नमवून विजयी सुरुवात केली होती. 

याआधी, सौदी अरबने अर्जेंटिनाला, तर जपानने जर्मनीला नमवून यंदाची विश्वचषक स्पर्धा गाजवली. मोरोक्कोने या शानदार विजयासह विश्वचषक स्पर्धा इतिहासातील आपला केवळ तिसरा विजय मिळविला. १९९८ साली मोरोक्कोने स्कॉटलंडला ३-०, तर १९८६ साली पोर्तुगालला ३-१ असे पराभूत केले होते. बेल्जियमने चेंडूवर ६७ टक्के नियंत्रण राखताना गोल करण्याच्या १० संधी निर्माण केल्या. मोरोक्कोनेही गोल करण्याच्या १० संधी निर्माण करत चारवेळा गोलजाळ्याचा वेध घेतला.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करत गोलशून्य बरोबरी साधली होती. दुसऱ्या सत्रात बेल्जियमकडून आक्रमक पुनरागमनाची अपेक्षा होती. मात्र, मोरोक्कोच्या बचावफळीने शानदार खेळ करत बेल्जियमला यशस्वी होऊ दिले नाही. अब्देलहमीद साबिरीने ७३व्या मिनिटाला शानदार गोल करत संघाला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर दबावात आलेल्या बेल्जियमकडून अनेक चुका झाला. निर्धारित वेळेनंतर अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्याच मिनिटाला झकारिया अबौखलाल याने बेल्जियमच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत अप्रतिम गोल करत मोरोक्कोचा विजय निश्चित केला. 

मोरोक्कोने दुसऱ्यांदा विश्वचषक सामन्याच्या दुसऱ्या सत्रात दोन गोल केले. विश्वचषक सामन्यातील पहिल्या सत्रात गोल न केल्यानंतरही विजयी होण्याची मोरोक्कोची पहिलीच वेळ.अब्देलहमीद साबिरी हा विश्वचषक सामन्यात मोरोक्कोकडून फ्री किकवर थेट गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला.विश्वचषक स्पर्धेत बेल्जियम-मोरोक्को दुसऱ्यांदा आमने-सामने आले आणि दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. विश्वचषक स्पर्धेत बेल्जियमचा आफ्रिकन संघाविरुद्ध पहिल्यांदाच पराभव झाला. विश्वचषक स्पर्धा इतिहासातील ५०वा सामना खेळताना पराभव पत्करणारा बेल्जियम हा इंग्लंड आणि स्पेननंतरचा तिसरा संघ ठरला.

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२