शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2022: फीफा विश्वचषकापूर्वी कतारचं रूप बदललं; बाजारपेठेतून दारूची दुकाने झाली गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 12:34 IST

यंदा जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फिफा विश्वचषकाचा थरार कतारच्या धरतीवर रंगणार आहे.

नवी दिल्ली : यंदा जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फीफा विश्वचषकाचा (FIFA World Cup 2022) थरार कतारच्या धरतीवर रंगणार आहे. २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मोठ्या स्पर्धेसाठी कतार पूर्णपणे सज्ज होत आहे. यामध्ये सुमारे १२ लाख पर्यटक येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पाहुण्यांसाठी शहरात दारूची दुकानेही सुरू करण्यात आली होती. मात्र आता कतार प्रशासनाने बाजारपेठेतून दारूची दुकाने हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दारू कंपन्या आणि आयोजकांमध्ये खळबळ उडाली आहे.

खरं तर फीफा विश्वचषक पहिल्यांदाच कतारच्या धरतीवर होत आहे. या बहुचर्चित स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येण्याची शक्यता आहे. या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी कतार येथे जोरदार तयारी सुरू आहे. प्रेक्षकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून कतार प्रशासन अनेक उपक्रम राबवत आहे. कतारने येथील  काही कडक कायदे देखील शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये दारू विक्री संबंधित नियमांचा देखील समावेश आहे. 

दारू कंपन्यांना मोठा झटका कतार येथे फीफा विश्वचषकाची स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच दारू विक्रेते आणि आयोजकांना मोठा झटका बसला आहे. कारण कतार प्रशासनाने बाजारातून दारूची दुकाने हटवण्याचे आदेश दिले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे या आयोजनामध्ये एक बिअर कंपनीचा देखील समावेश आहे. त्यांनी जवळपास ६०७ कोटी रूपये गुंतवले आहेत. अचानक आलेल्या आदेशांमुळे त्यांनाही झटका बसला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तसे केले नाही तर मोठी गडबड होण्याती भीती स्थानिकांमध्ये होती. जनतेची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

पर्यटकांसाठी उभारले 'फॅन झोन'२०१० मध्ये जेव्हा FIFA ने कतारला यजमानपद दिले होते, त्याच वेळी मद्यविक्री आणि प्रचाराबाबत करार करण्यात आला होता. मात्र  कतारमध्ये दारूवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. कतारमधील काही हॉटेल्स आणि बारमध्ये दारू मिळणार आहे. परंतु बहुतेक ठिकाणी ते पिण्यास परवानगी दिली जाणार नाही. प्रेक्षक आणि पर्यटकांसाठी स्टेडियमपासून दूर फॅन झोन तयार केला जात असला तरी येथून स्टेडियम ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

यावेळी विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊसअलीकडेच फीफा विश्वचषकाची बक्षीस रक्कम देखील जाहीर करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण विश्वचषकात वाटण्यात येणारी बक्षीस रक्कम सुमारे 3,585 कोटी एवढी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला ४२ मिलियन म्हणजेच सुमारे ३४२ कोटी रूपये मिळणार आहेत. मागील अर्थात २०१८च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम ४ मिलियन डॉलरहून अधिक आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Qatarकतारalcohol prohibition actदारुबंदी कायदा