शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

विश्वचषकात माध्यमांना टाळणाऱ्या फुटबॉलपटूंना फिफा ठोठावणार दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 06:10 IST

फ्रेंच फुटबॉल फेडरेशनने इशारा दिल्यानंतरही एमबाप्पेने दुर्लक्ष करीत डेन्मार्कवरील विजयानंतर पुन्हा चूक केली

अभिजित देशमुख 

दोहा : डेन्मार्कविरुद्ध फ्रान्सच्या विजयानंतर माध्यमांशी बोलण्यास नकार देणारा कायलियन एमबाप्पेला फिफाकडून दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे. सामनावीर ठरलेल्या एमबाप्पेला आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून टीकेचे धनी व्हावे लागेल, असेही म्हटले जात आहे. त्याआधी, फ्रान्सने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही २३  वर्षांच्या एमबाप्पेने माध्यमांना टाळले होते.

फ्रेंच फुटबॉल फेडरेशनने इशारा दिल्यानंतरही एमबाप्पेने दुर्लक्ष करीत डेन्मार्कवरील विजयानंतर पुन्हा चूक केली. यामुळे  एमबाप्पे आणि फ्रेंच फुटबॉल फेडरेशन दोघेही फिफाकडून दंडित होऊ शकतात. आपल्या भविष्याबाबत प्रश्न विचारला जाऊ शकतो, अशी शंका आल्याने एमबाप्पेने माध्यमांना टाळल्याचे म्हटले जाते. घानाविरुद्ध सलामीच्या सामन्यानंतर पोर्तुगालचा  ख्रिस्टियानो रोनाल्डोनेही पत्रकाच्या मँचेस्टर युनायटेडने संपुष्टात आणलेल्या करारावरील प्रश्नाला बगल दिली होती. बाद फेरी गाठणारा सेनेगलदेखील अडचणीत आला. प्रत्येक संघाने  सामन्याच्या आदल्या दिवशी मुख्य माध्यम कक्षात पत्रपरिषद घेणे अनिवार्य आहे. यावेळी संघाचे प्रशिक्षक, एक खेळाडू, त्यातही कर्णधाराने हजेरी लावणे आवश्यक आहे. सेनेगलने ही परंपरा खंडित केल्याने फिफाकडून चौकशी होईल, असे बुधवारी सांगण्यात आले.

शिस्तभंग कारवाईची बुधवारी झाली घोषणा  नेदरलँड्सविरुद्ध सलामी लढतीच्या आदल्या दिवशी सेनेगलकडून आक्रमक फळीतील क्रेपिन डायटा आणि कर्णधार कॉलिबली या दोघांनी प्रशिक्षक ॲलिउ सिसे यांच्यासोबत पत्रकार कक्षात हजेरी लावली. तथापि, इक्वेडोरविरुद्धच्या सामन्याआधी एकही खेळाडू उपस्थित नव्हता. एकटे प्रशिक्षक ४० मिनिटे संवाद साधत होते. फिफाने याप्रकरणी बुधवारी सकाळी  शिस्तभंगाच्या कारवाईची घोषणा केली. सेनेगल फुटबॉल महासंघाविरुद्ध ‘फिफा विश्वचषक कतार २०२२’च्या नियम ४४ तसेच माध्यम आणि विपणन नियम २.७.२ नुसार कारवाई सुरू करणार असल्याचे फिफाने म्हटले आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२