शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

FIFA: बलाढ्य संघांमध्ये आज रंगणार महामुकाबला; पोर्तुगालपुढे मोरोक्कोचे कडवे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 06:01 IST

Morocco vs Portugal: यंदा मोरोक्कोसारखा नवोदित संघ लक्षवेधी ठरला. या टप्प्यापर्यंत पोहोचलेला तो पहिला अरब आणि चौथा आफ्रिकी संघ ठरला.

थुमामा :  १६ वर्षांनंतर फिफा विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ शनिवारी प्रथमच बाद फेरीत दाखल झालेल्या मोरोक्कोविरुद्ध दोन हात करणार आहे. आतापर्यंत विश्वचषकात उभय संघ आमने-सामने येण्याची ही तिसरी वेळ असेल.

रोनाल्डोला बाकावर बसवून खेळणाऱ्या पोर्तुगालने स्वित्झर्लंडला ६-१ ने नमवून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली; तर मोरोक्कोने २०१० चा चॅम्पियन स्पेनविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून हा टप्पा गाठला.  २०१८ च्या विश्वचषकात पोर्तुगालने मोरोक्कोला १-० ने धूळ चारली होती. त्याआधी  मात्र १९८६ ला मोरोक्कोने पोर्तुगालचा ३-१ असा पराभव केला होता. यंदा मोरोक्कोसारखा नवोदित संघ लक्षवेधी ठरला. या टप्प्यापर्यंत पोहोचलेला तो पहिला अरब आणि चौथा आफ्रिकी संघ ठरला.

याशिवाय धक्कादायक निकालांच्या या स्पर्धेतले शिल्लक प्रकरण म्हणूनही या संघाकडे पाहता येईल. रोनाल्डोशिवाय पोर्तुगाल नुसताच नव्हे, तर दिमाखात जिंकू शकतो हे स्वित्झर्लंडविरुद्ध दिसून आले आहे. शिवाय ब्राझीलप्रमाणेच पोर्तुगालचा खेळही आधीच्या फेरीमध्ये प्रवाही आणि आकर्षक होता. परंतु, या टप्प्यावर निव्वळ कौशल्यापेक्षा अनुभवही निर्णायक ठरत असतो. त्यामुळेच माजी विजेत्या संघाला  मोरोक्कोच्या तुलनेत अधिक संधी असेल, असे भाकीत करता येईल.

इंग्लंडपुढे फ्रान्सचा कठीण पेपर

दोहा : गतविजेता फ्रान्स आणि इंग्लंड या फुटबॉलमधील महाशक्तींमध्ये रंगणारे द्वंद चाहत्यांसाठी अफलातून खेळाची मेजवानी पेश करणारे ठरू शकते. कारण, दोन्ही संघांमध्ये उत्तमोत्तम खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे प्रत्येक गोलसाठी चुरस पाहायला मिळू शकते. मात्र, दोन्ही संघांचे एकूण बलाबल लक्षात घेता गतविजेता फ्रान्स काहीसा वरचढ भासतो आहे. मात्र, इंग्लंड यंदाच्या विश्वचषकात एकाही सामन्यात पराभूत झालेला नाही, तर फ्रान्सला मात्र ट्युनिशियाकडून १-० असा अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला.

एमब्बाप्पे विरुद्ध वॉकरफ्रान्सला जर रोखायचे असेल तर प्रतिस्पर्धी संघाला सर्वांत आधी एमबाप्पेला आवर घालणे गरजेचे ठरते. गेल्या विश्वचषकापासून केलेल्या एकूण गोलपैकी सात गोलमध्ये एमब्बापेचा सहभाग होता. कारण, एकदा एमब्बाने चेंडूवर ताबा मिळवला तर त्याच्या वेगाशी बरोबरी करणे अनेक खेळाडूंना जमत नाही. अशात कायले वॉकर इंग्लंडसाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतो. चॅम्पियन लीगमध्ये तीनवेळा वॉकरने एमब्बापेला रोखले होते.

केन विरुद्ध गिरुडदोन्ही आपापल्या संघांचे प्रमुख स्ट्रायकर आहेत. ऑलिव्हर गिरुड नुकताच फ्रान्सकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. तर हॅरी केनला वेन रुनीचा एक विक्रम खुणावतो आहे. संघाचे आधारस्तंभ असलेल्या या दोघांच्या कामगिरीवरच संघाचे यशापयश अवलंबून आहे. पण डी मध्ये आतापर्यंत गिरुडकडून अधिक प्रभावी खेळ पाहायला मिळाला आहे.   

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२