फेड- राफा एकत्र खेळणार

By admin | Published: August 26, 2016 03:31 AM2016-08-26T03:31:24+5:302016-08-26T03:31:24+5:30

माजी नंबर वन डेनिसपटू स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल हे पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये आयोजित लेवर चषक टेनिस स्पर्धेत दुहेरीत एकत्र खेळताना दिसतील.

Fed-Rafa will play together | फेड- राफा एकत्र खेळणार

फेड- राफा एकत्र खेळणार

Next


प्राग : माजी नंबर वन डेनिसपटू स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल हे पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये आयोजित लेवर चषक टेनिस स्पर्धेत दुहेरीत एकत्र खेळताना दिसतील.
या स्पर्धेत युरोप आणि शेष विश्व संघांदरम्यान सामने खेळविले जातील. पुढील वर्षी २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा पहिल्यांदा येथे आयोजित होईल. लेवर चषकाचे अनावरण फेडरर- नदाल यांच्या उपस्थितीत न्यूयॉर्कमध्ये झाले.
माजी ग्रॅण्डस्लॅम विजेता बोजोन बोर्ग आणि जॉन मॅकेन्रो यांना कर्णधार नेमण्यात आले. रॉड लेवर यांच्या नावे या स्पर्धेचे नाव लेवर चषक ठेवण्याची घोषणा आयोजकांनी केली. १९६९ मध्ये लेवर हे कॅलेंडर वर्षांत ग्रॅण्डस्लॅम पूर्ण करणारे अखेरचे खेळाडू ठरले. नोवाक जोकोविच आणि आॅलिम्पिक सुवर्ण विजेता अ‍ॅण्डी मरे हे देखील स्पर्धेत खेळतील, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली.
डेव्हिस चषक सेमीफायनलनंतर या नव्या स्पर्धेचे आयोजन होईल.
३५ वर्षांचा फेडरर म्हणाला,‘मी आणि नदाल सोबत खेळू यावर विश्वास बसत नाही.’ फेडररने १७ तर नदालने १४ ग्रॅण्डस्लॅम जिंकले आहेत. दोघांना दुहेरीत एकत्र खेळताना पाहण्याची अनेकांना उत्कंठा आहे.
नदालने करिअरमध्ये फेडररविरुद्ध ३४ पैकी २३ सामने जिंकले. ३० वर्षांचा नदाल म्हणाला,‘ लेवर चषक आॅलिम्पिक संपल्यानंतरच्या वर्षी दरवेळी आयोजित करण्यात येईल. यात एकेरीचे तीन आणि दुहेरीचा एक असे दरदिवशी चार सामने खेळविले जातील. लेवर चषकात युरोपियन संघात सध्याच्या रँकिंगनुसार खेळाडूंची निवड होईल. सध्या जागतिक टेनिसमधील २० अव्वल खेळाडूंमध्ये पाच जण बिगर युरोपियन आहेत. युरोपाबाहेर कॅनडाचा मिलोस राओनिक हा सहाव्या स्थानावरील खेळाडू आहे. मिलोस विम्बल्डनचा उपविजेता देखील आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Fed-Rafa will play together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.