ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. ६ - आर. अश्विनने पहिल्या कसोटीत आज पाच बळी मिळवत भारताकडून सर्वात जलद १५० विकेट घेण्याचा पराक्रम केला, यासाठी त्याने २९ सामने घेतले. भारताकडून यापुर्वी अनिल कुंबळे आणि इरापल्ली प्रसन्ना यांनी ३४ सामन्यात १५० विकेट घेतल्या होत्या. ऑफस्पिनर अश्विनने भारतात विकेटच शतकही पुर्ण केले.
आर. अश्विन कसोटी क्रमवारीत जलद १५० कसोटी विकेट घेण्यात चौथ्या क्रमांकावर आहे. सिडनी बर्म यांनी २४ सामन्यात १५० विकेट घेतल्या आहेत, ते या क्रमवारीत अग्रस्थानी आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा वकार युनिस (२७) आणि ग्रिमेंट (२८) यांचा क्रमांक लागतो.