शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

मैदानी खेळात स्पोर्टस्वेअर बनली एक फॅशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 2:20 AM

मैदानी खेळात दिवसागणिक नवीन स्पोर्टस्वेअरकडे नवीन खेळाडूंचा अधिक कल आहे!

- रितिका भारवाणी जयसिंघानीमैदानी खेळात दिवसागणिक नवीन स्पोर्टस्वेअरकडे नवीन खेळाडूंचा अधिक कल आहे! मैदानी खेळातील गणवेश किंवा स्पोर्टस्वेअर ही एक फॅशन झाली आहे. प्रत्येक दिवशीच्या उपक्रमाला नवीन गणवेश परिधान करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. शाळा, प्रवास किंवा कॉफी कोठेही या प्रकारच्या विविध स्पोर्टस्वेअर परिधान करण्याच्या मानसिकता आपण अनुभवत आहोत.सुंदर दिसण्यासाठी स्पोर्टस् फॅशनकडे खेळाडूंचा कल वाढला असून, आल्हाददायक कपडे परिधान करणे प्रत्येकास सोयीस्कर वाटू लागले आहे. घाम शोषून घेणारे, नवनवीन शैली, ब्रँडस्, कामात जास्त काळ तग धरणारे आणि फॅशनेबल स्टाईलच्या कपड्यांना पसंती मोठ्या प्रमाणात मिळत आहे. ऋतुमानानुसार स्पोर्टस्वेअरच्या आवडी-निवडी बदलत आहेत. काही प्रभावी आणि आकर्षक शैलीमुळे नवीन कपडे पसंत करणे हा जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनत चालला आहे.कोणत्याही स्पोर्टस्वेअरवर वापरता येणारे बूट (स्निकर्स) लाही पसंती मिळत आहे. लोक हे बूट साधारणपणे सर्वच प्रकारच्या गणवेशांवर वापरण्यास प्राधान्य देत आहेत. मोठे ब्रँड असणाऱ्या कंपन्या ग्राहकास आकर्षित करीत आहेत, विविधबाबतीत निरीक्षण केले असता खेळाडूंत जणू काही नवनवीन पेहरावाचे कल वाढत आहेत, असे निदर्शनात येत आहे. शहरी ग्राहक जे सदैव अ‍ॅक्टिव्ह लाईफस्टाईलच्या मागे धावत असतात आणि चांगले दिसण्याचा प्रयत्नही करीत असतात. ते हा बदल पटकन स्वीकारतील आणि या ‘ट्रेंड’ला आत्मसात करतील.(‘ईला’च्या सहसंस्थापिका व क्रिएटिव्ह डायरेक्टर)