ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 5 - न्यूझीलंड संघाविरोधातील दुसरा कसोटी सामना भारताने चौथ्या दिवशी अत्यंत सहजतेने जिंकला. या विजयामध्ये गोलंदाज मोहम्मद शामीनेही महत्वाचा वाटा उचलला. मोहम्मद शामीने एकूण सहा विकेट्स घेत भारतीय संघाचा विजयाचा मार्ग मोकळा केला. खेळामध्ये जिद्द काय असते याचा प्रत्यय मोहम्मद शामीकडे पाहिल्यावर येतो, कारण ज्यावेळी मैदानावर खेळत असताना दुसरीकडे त्याची 14 महिन्यांची मुलगी आयसीयूमध्ये होती.
ईडन गार्डनमधील कसोटी सामन्याला सुरुवात झाल्यानंतर दुस-याच दिवशी शामीच्या मुलीला श्वसनाचा त्रास होऊ लागला. ताप आणि श्वसनाचा त्रास एकत्र सुरु झाला होता त्यामुळे सिटी हॉस्पिटमध्ये तिला उपचारासाठी नेण्यात आलं होतं. तब्बेत जास्त बिघडल्याने तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. खेळ संपल्यानंतर शामीला त्याच्या मुलीची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच शामीने रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र रात्री इतर खेळाडूंसोबत हॉटेलमध्ये तो हजर होता. दुस-या दिवशी पुन्हा शामीने हाच दिनक्रम फॉलो केला.
एकीकडे भारत 250 वा कसोटी सामना खेळत होता तर दुसरीकडे त्याची मुलगी आयसीयूमध्ये होती. मात्र या परिस्थितीतही शामीने खेळासाठी आपली कमिंटमेंट कायम ठेवली. खेळ संपल्यानंतर शामी तसाच रुग्णालयात जात असे, आणि दुस-या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी मैदानावर हजर असे.
Smile face pic.twitter.com/n8oVcri26L— Mohammed Shami (@MdShami11) September 15, 2016
हा सामना जिंकल्यास भारत रँकिंगमध्ये अव्वल जाणार होता सोबतच मालिकाही खिशात टाकायला मिळणार होती. त्यामुळेच शामीने माघार घेतली नाही. शामीने पहिल्या डावात 18 तर दुस-या डावाच 18.1 ओव्हर्स केल्या. टेस्टमध्ये फार कमी वेळा एखाद्या फास्ट बॉलरने स्पिनर्सपेक्षा जास्त ओव्हर्स टाकलेल्या पाहायला मिळतात. पण हे शामीने करुन दाखवलं.
चौथ्या दिवशी भारताने सामना जिंकला आणि दुसरीकडे मुलीलाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला ज्यामुळे शामीचा आनंद डबल झाला होता. शामीच्या या जिद्दीचं कौतुक कराव तितकं कमीच.
No. 1 ☝️ #TeamIndiapic.twitter.com/KQ5LtPyk69— Mohammed Shami (@MdShami11) October 4, 2016