शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
3
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
4
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
5
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
6
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
7
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
8
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
9
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
10
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
11
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
12
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
13
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
14
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
15
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
16
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
17
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
18
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
19
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
20
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडला खडतर आव्हान

By admin | Updated: February 14, 2015 00:28 IST

विश्वचषकाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला आॅस्ट्रेलियाचे खडतर आव्हान असेल. पारंपरिक प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचा रेकॉर्ड फारसे चांगले नाही.

मेलबोर्न : विश्वचषकाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला आॅस्ट्रेलियाचे खडतर आव्हान असेल. पारंपरिक प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचा रेकॉर्ड फारसे चांगले नाही. पहिल्या विश्वविजेतेपदासाठी आसुसलेल्या इंग्लंडला तिरंगी मालिकेतील अंतिम लढतीत सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागले. एमसीसीवर पुन्हा एकदा ९० हजार प्रेक्षकांपुढे आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजय नोंदविण्याचे आव्हान असेल. गेल्या १५ सामन्यांत इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला केवळ दोनदा पराभूत केले. शिवाय तीनदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागलेल्या इंग्लंडला १९९२ साली आॅस्ट्रेलियानेच धूळ चारून जेतेपदापासून दूर ठेवल्याचा इतिहास आहे. इंग्लंडला कठीण समजल्या जाणाऱ्या ‘अ’ गटात स्थान मिळाले. याच गटात १९९६ चा विजेता श्रीलंका आणि सहयजमान न्यूझीलंडचा समावेश आहे. आॅस्ट्रेलियाने २३ वर्षांआधी विश्वचषकाचे यजमानपद भूषविले, तेव्हा इंग्लंडनेच त्यांना उपांत्य फेरीत नमविले होते. त्या विजयापासून इंग्लंड प्रेरणा घेऊ शकतो.आॅस्ट्रेलियन संघाला या सामन्यात कर्णधार मायकेल क्लार्कविना खेळावे लागेल. तो अनफिट आहे. तरीही इंग्लंडवर विजय नोंदवित सहा आठवडे चालणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभात शानदार सलामी देण्याचा आॅस्ट्रेलियाचा इरादा दिसतो. गेल्या १२ वन डेत केवळ एकच पराभव पचविणारा हा संघ ऐन विश्वचषकाच्या तोंडावर फॉर्ममध्ये परतला, असेच म्हणावे लागेल. गेल्या नोव्हेंबरमध्ये मायदेशात आॅस्ट्रेलियाने द. आफ्रिकेचा ४-१ ने पराभव केला. पाठोपाठ भारत आणि इंग्लंडवरही वर्चस्व गाजविले होते. इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन स्वत: फलंदाजीत अपयशी ठरला. गेल्या चारपैकी तीन डावांत त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. सराव सामन्यातही त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. ‘शनिवारी दहा-वीस चेंडूंचा सामना करू शकलो तर उत्तम होईल. पाच सामन्यांआधी मी शतक झळकवले. चांगल्या कामगिरीसाठी केवळ एक उत्तम खेळीची गरज असेल,’ असे मॉर्गन म्हणाला. (वृत्तसंस्था)