शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड पराभूत,भारताचा १३३ धावांनी विजय

By admin | Updated: August 28, 2014 01:43 IST

सुरेश रैनाच्या आक्रमक, पण आकर्षक शतकामुळे (१००) मिळालेले ‘टॉनिक’ टीम इंडियाने विजयासाठी वापरल्यामुळे बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये इंग्लंडविरुद्ध तब्बल १३३ धावांनी विजय साकार झाला

कार्डिफ : सुरेश रैनाच्या आक्रमक, पण आकर्षक शतकामुळे (१००) मिळालेले ‘टॉनिक’ टीम इंडियाने विजयासाठी वापरल्यामुळे बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये इंग्लंडविरुद्ध तब्बल १३३ धावांनी विजय साकार झाला. रवींद्र जडेजाने (४/२८) देखील गोलंदाजीतील कौशल्य पणाला लावून विजयास हातभार लावला. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमांचा अवलंब करण्यात आला होता. या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला आघाडी मिळाली. पावसामुळे पहिला सामना रद्द झाला होता.रोहित शर्मा (५२), अजिंक्य रहाणे (४१) यांनी भारताला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरल्यानंतर रैनाने ७५ चेंडूंत १२ चौकार व तीन षटकारांसह १०० धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंह धोनी (५२) याच्यासोबत पाचव्या गड्यासाठी १४४ धावांचंी भागीदारी करीत भारताला ५० षटकांत ६ बाद ३०४ अशा सुस्थितीत नेऊन ठेवले. यातील १३३ धावा अखेरच्या १३ षटकांत वसूल झाल्या हे विशेष. इंग्लंडच्या डावाला प्रारंभ होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने ४७ षटकांत २९५ धावांचे यजमान संघाला लक्ष्य देण्यात आले होते. पण भारताच्या वेगवान आणि फिरकी माऱ्यापुढे इंग्लिश फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्यामुळे ३८.१ षटकांत १६१ धावांत त्यांचा डाव गडगडला. पहिली वन-डे खेळणारा अ‍ॅलेक्स हेल्स याचा ४० धावांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. डावखुरा फिरकीपटू जडेजाने ७ षटकांत २८ धावांत चार गडी बाद केले. मोहम्मद शमी याने ३२ धावांत दोन आणि आश्विनने ३८ धावांत दोन गडी बाद केले. भुवनेश्वर आणि रैना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.तत्पूर्वी नाणेफेक गमाविणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली. शिखर धवन (११), आणि विराट कोहली (०) यांचे अपयश संपण्याची चिन्हे आजही दिसली नाहीत. आठ षटकांत २ बाद १९ या बिकट अवस्थेतून अजिंक्य रहाणे (४१) आणि रोहित शर्मा (५२) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करीत बाहेर काढले. दोघेही २२ धावांच्या फरकाने बाद झाल्यानंतर त्यांची जागा रैना-धोनी यांनी घेतली. पॉवर प्लेमध्ये दोघांनी सुरेख फटकेबाजी केली. रैनाचे गेल्या साडेचार वर्षांत हे पहिले, तर वन-डेतील चौथे शतक ठरले. कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानेही जबाबदारी ओळखून अर्धशतक (५२) ठोकले. ३० षटकांत ४ बाद १३२ या स्थितीत रैना-धोनी यांनी खेळाची सूत्रे स्वीकारून पाचव्या गड्यासाठी १४४ धावांची भागीदारी केली. ख्रिस वोक्स इंग्लंडचा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५२ धावा देत चार, तर फिरकीपटू जेम्स ट्रेडवेल याने ४२ धावांत दोन गडी बाद केले. (वृत्तसंस्था)