शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

सिडनीमध्ये भावनिक कसोटी

By admin | Updated: January 2, 2015 02:11 IST

दुखापतीमुळे फिलिफ ह्युजला गमाविणारा आॅस्ट्रेलियन क्रिकेट संघ या मैदानावर मालिकेतील अखेरचा कसोटी खेळण्यासाठी दाखल होतील, त्यावेळी भावना उचंबळून आल्याचे चित्र दिसेल.

सिडनी : आॅस्ट्रेलियाने मालिकेत विजयी आघाडी घेतली असली तरी भारतीय कर्णधार कर्णधार महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती आणि सिडनी मैदानावर सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे फिलिफ ह्युजला गमाविणारा आॅस्ट्रेलियन क्रिकेट संघ या मैदानावर मालिकेतील अखेरचा कसोटी खेळण्यासाठी दाखल होतील, त्यावेळी भावना उचंबळून आल्याचे चित्र दिसेल. आॅस्ट्रेलिया आणि भारत यांच्यासाठी जय-पराजचाचा विचार करता सिडनी कसोटी सामन्याला विशेष महत्त्व नाही, पण उभय संघांसाठी हा मात्र भावुक करणार कसोटी सामना ठरणार आहे. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मेलबोर्न कसोटी सामना अनिर्णित संपल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघाचे नेतृत्व आता युवा विराट कोहली करणार आहे. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या सारख्या अनुभवी खेळाडूंनंतर ३३ वर्षीय धोनी संघाचा सर्वांत अनुभवी खेळाडू व सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यशाचे नवे शिखर गाठले आहे. कसोटी क्रिकेटमधून धोनीच्या निवृत्तीनंतर २६ वर्षीय विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे. युवा कर्णधार व युवा संघ आॅस्ट्रेलियात धोनीच्या कसोटी कारकीर्दीला या अखेरच्या सामन्यात विजयाची ‘गिफ्ट’ देण्यास उत्सुक आहे. केवळ कसोटी क्रिकेटच नाही तर धोनी क्रिकेटच्या प्रत्येक स्वरुपात भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विदेशात भारतीय संघ अपयशी ठरत असल्यामुळे धोनीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले. या मालिकेत भारतीय संघाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. मेलबोर्न कसोटी सामना अनिर्णित राखताना भारतीय संघ आॅस्ट्रेलियाची विजयाची मालिका खंडित करण्यात यशस्वी ठरला, त्याचे सर्व श्रेय धोनीच्या नाबाद २४ धावांच्या खेळीला जाते. त्याने संयमी फलंदाजी करीत सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विराट, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, लोकेश राहुल यांच्यासारख्या कसोटी क्रिकेटचा विशेष अनुभव नसलेल्या खेळाडूंवर एकाएकी मोठी जबाबदारी आली आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर त्यांच्यापुढे विजयासह पुढे वाटचाल करण्याचे आव्हान राहणार आहे. आॅस्ट्रेलियन संघातील या चार खेळाडूंसाठी या मैदानावर खेळणे भावनिक क्षण ठरणार आहे. आस्ट्रेलियाने यापूर्वी भारताविरुद्धच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्या मते सिडनी कसोटी सामना भावुक क्षण ठरणार आहे. (वृत्तसंस्था)४दुसऱ्या बाजूचा विचार करता संघसहकारी फिल ह्युजचा सिडनी मैदानावर सामन्यादरम्यान डोक्यावर बाऊंसर आदळल्यामुळे झालेल्या मृत्यूनंतर आॅस्ट्रेलियन संघ प्रथमच या मैदानावर कसोटी सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. ह्युजच्या अपघाती निधनामुळे या मालिकेच्या कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला. या घटनेनंतर आॅस्ट्रेलियन संघ भावुक झाला होता आणि ह्युजच्या निधनामुळे आॅस्ट्रेलियातील वातावरण शोकाकुल होते. ४या दु:खद घटनेनंतर यजमान संघासाठी सिडनी मैदानावर खेळणे म्हणजे भावनिक क्षणांना पुन्हा उजाळा मिळणार आहे. यजमान संघ या मैदानावर विजय मिळवित ह्युजला श्रद्धांजनी अर्पण करण्यास प्रयत्नशील आहे. ४फिल ह्युज जीवनातील अखेरच्या डावात फलंदाजी करीत असताना आॅस्ट्रेलिया संघातील ब्रॅड हॅडिन, नॅथन लियोन, शेन वॉटसन आणि डेव्हिड वॉर्नर मैदानावर क्षेत्ररक्षण करीत होते. सिडनी मैदानावर सामनान्यादरम्यान वेगवान गोलंदाज सीन एबोटचा बाऊंसर ह्युजच्या डोक्यावर आदळला आणि दोन दिवसानंतर ह्युजने जगाचा निरोप घेतला.