शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा महासंघांची आर्थिक स्थिती ढासळली;जगभरातील क्रीडा संघटना अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 06:47 IST

कोरोना व्हायरस महामारीमुळे टोकियो आॅलिम्पिक स्थगित व क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांची आर्थिक स्थिती प्रभावित होत आहे.

लुसाने : कोरोना व्हायरस महामारीमुळे टोकियो आॅलिम्पिक स्थगित व क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांची आर्थिक स्थिती प्रभावित होत आहे. अनेक असे खेळ आहेत की जे आॅलिम्पिकचा भाग आहे आणि आपल्या कमाईसाठी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीकडून (आयओसी) प्रत्येक चार वर्षांनी मिळणाऱ्या धनराशीवर अवलंबून आहेत.एका प्रमुख आंतरराष्ट्रीय महासंघाच्या अधिकाºयाने म्हटले की, ‘स्थिती तणावपूर्ण व निराशाजनक आहे. मूल्यांकन करण्यात येईल, अनेकांची नोकरी धोक्यात आहे.’

टोकियो आॅलिम्पिकमध्ये २८ आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ उपस्थित राहणार होते आणि त्यांना आयओसीकडून पुरेशी रक्कमही मिळणार होती. पण स्पर्धा २०२१ पर्यंत स्थगित झाल्यामुळे त्यांना आता ही रक्कम मिळू शकणार नाही.

आंतरराष्ट्रीय उन्हाळी खेळ संघटनेच्या महासंघाचे (एएसओआयएफ) महासचिव अ‍ॅण्ड्र्यू रेयान म्हणाले, ‘आमचे अनेक आंतरराष्ट्रीय महासंघ आहेत. त्यांच्याकडे पुरेसा पैसा आहे, पण अन्य महासंघ वेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक पद्धतीने चालतात. त्यांच्या मिळकतीचा मुख्य स्रोत क्रीडा स्पर्धा असते आणि या स्पर्धा सध्या ठप्प आहेत. जर त्यांच्याकडे पुरेसा पैसा नसेल तर त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. आंतरराष्ट्रीय महासंघाना पैसा पुरविण्यासाठी एएसओआयफ जबाबदार असते.

टोकिया आॅलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आलेले कराटे, सर्फिंग, स्केटबोर्डिग, क्लाइंबिंग आणि बेसबॉल-सॉफ्टबॉल रक्कम मिळविण्यास पात्र नाहीत. (वृत्तसंस्था)

पंच गोळा करत आहेत निधी

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट सामने होत नसल्याने पूर्णपणे क्रिकेटवर अवलंबून असलेले स्थानिक पंच व स्कोअरर यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) व्यवस्थापन समितीतील माजी सदस्य व बीसीसीआयचे माजी पंच गणेश अय्यर यांच्या नेतृत्वाखाली पंचाचा एक गट त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरला आहे.क्रिकेटवर उपजिविका असलेला पंच व स्कोअररसाठी या गटाने एक निधी उभारला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020