शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आॅस्ट्रेलियाचा सहज विजय

By admin | Published: September 04, 2015 10:55 PM

मॅथ्यू वॅड (७१) आणि डेव्हिड वॉर्नर (५९) यांच्या अर्धशतकी खेळींनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या

साऊथम्पटन : मॅथ्यू वॅड (७१) आणि डेव्हिड वॉर्नर (५९) यांच्या अर्धशतकी खेळींनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे लढतीत इंग्लंडचा ५९ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाने ६ बाद ३०५ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंड संघाचा डाव ४५.३ षटकांत २४६ धावांत गुंडाळला. पाहुण्या संघातर्फे सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (५९) जो बर्न्ससोबत (४४) सलामीला ७६ धावांची तर कर्णधार स्टिव्हन स्मिथसोबत (४४) दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आॅस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाल्यामुळे आॅस्ट्रेलियाची ६ बाद १९३ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या मॅथ्यू वॅडने (नाबाद ७१) मिशेल मार्शसोबत (नाबाद ४०) सातव्या विकेटसाठी ११२ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला ३०० चा पल्ला ओलांडून दिला. वॅडने ५० चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकारांच्या सहाय्याने ७१ धावांची नाबाद खेळी केली. इंग्लंडतर्फे फिरकीपटू आदिल रशीदने ५९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले तर मार्क वुडने एक बळी घेतला. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. जेसन रॉय (६७) आणि अ‍ॅलेक्स हेल्स यांनी सलामीला ७० धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत इंग्लंडचा डाव २४६ धावांत गुंडाळला. इंग्लंडतर्फे जेसन टेलर (४९) आणि कर्णधार इयान मॉर्गन (३८) यांनी उपयुक्त योगदान दिले. याव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. शेन वॉटसन व नॅथन कोल्टन लीन यांनी प्रत्येकी ३९ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी २ बळी घेतले. मिशेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनीही प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी परतवले. मालिकेत यानंतरची लढत शनिवारी लंडनमध्ये लॉर्ड््स मैदानावर खेळल्या जाणार आहे. (वृत्तसंस्था)