भुवनेश्वर : वेगवान धावपटू दुतीचंद हिला जगातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या‘ टाईम नेक्स्ट १००’ यादीत स्थान मिळाल्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तिचे अभिनंदन केले आहे. ‘ओडिशाला तुमच्या कामगिरीचा अभिमान वाटतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,’ असे पटनायक यांनी टिष्ट्वटवर लिहिले. केंद्रीय पेट्रोलिम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही दूतीचे अभिनंदन केले. दुतीने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १०० व २०० मीटर प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. नेपोली येथे विश्व विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.
दुतीचंदला ‘टाईम नेक्स्ट १००’मध्ये स्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 04:25 IST