शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

ड्युमिनीने दिले संघात बदल करण्याचे संकेत

By admin | Updated: April 28, 2015 00:33 IST

सात सामन्यांत चौथ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार जेपी ड्युमिनीने फॉर्मात नसलेल्या युवराजसिंगची पाठराखण केली

नवी दिल्ली : सात सामन्यांत चौथ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार जेपी ड्युमिनीने फॉर्मात नसलेल्या युवराजसिंगची पाठराखण केली असली तरी आगामी सामन्यांमध्ये संघात बदल करण्याचे संकेत दिले आहेत.डेअरडेव्हिल्स संघाला रविवारी फिरोजशाह कोटलावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागला. बंगलोरने ही लढत ५७ चेंडू व १० गडी राखून जिंकली. दिल्ली संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ ९५ धावांत गारद झाला. लक्ष्याचा पाठलाग करताना ख्रिस गेलच्या नाबाद ६२ धावांच्या खेळीच्या जोरावर बंगलोर संघाने सहज विजयाची नोंद केली. ड्युमिनी म्हणाला, ‘केवळ एकट्या युवराजला दोषी धरणे चुकीचे आहे. आमची सर्वांची कामगिरी निराशाजनक झाली. पहिल्या षटकात विकेट गमावल्यापासून आम्ही बॅकफुटवर ढकलले गेलो. संघाला पुन्हा विजयी मार्गावर येण्यासाठी सांघिक कामगिरीची गरज आहे. यानंतर आम्हाला येथे आणखी एक लढत खेळायची आहे. आम्ही स्थानिक चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे.’वेगवान गोलंदाज झहीर खान दुखापतीमुळे अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही, तर मोहम्मद शमीने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे डेअरडेव्हिल्स संघाची गोलंदाजीची बाजू कमकुवत झाली आहे. झहीर सामना खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे ड्युमिनी म्हणाला. झहीर ९५ टक्के फिट असून तो पुनरागमन करण्यास उत्सुक असल्याचे ड्युमिनीने सांगितले. (वृत्तसंस्था) ही निराशाजनक कामगिरी आहे. फलंदाजी व गोलंदाजी या विभागात कामगिरीत सातत्य राखण्यात आम्ही अपयशी ठरत आहोत. स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी यानंतर खेळल्या जाणाऱ्या लढतींमध्ये प्रत्येक खेळाडूला सध्याच्या तुलनेत किमान १० टक्के अधिक चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आरसीबीने चांगली गोलंदाजी केली. त्यांनी प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले. या पराभवातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. संघात बदल करण्याची गरज आहे का, याबाबत आगामी काही दिवस आम्ही विचार करू. मी मोठे फेरबदल करण्याबाबत बोलत नाही. तसे बघता संघ निवड करणे माझ्या अधिकारामध्ये नाही. - जे. पी. ड्युमिनीआयपीएलच्या लिलावामध्ये विक्रमी १६ कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आलेल्या युवराजची कामगिरी चांगली होत नसल्यामुळे संघावर दडपण आले आहे. युवराजने ७ सामन्यांत १७.७१ च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत. रविवारी त्याच्याकडे मोठी खेळी करण्याची चांगली संधी होती, पण तो केवळ २ धावा काढून माघारी परतला. ड्युमिनीने युवराजची पाठराखण केली आणि वेगवान गोलंदाज झहीर खानच्या पुनरागमनाचे संकेत दिले.