दोहा : भारताचा मुष्टियुद्धपटू मदनलालला विश्व मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत चांगली सुरुवात करूनसुद्धा ५२ किलो वजन गटात पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. राष्ट्रीय विजेता मदनलाल इटलीच्या विनसेंजो पिकार्डीकडून ०-३ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून बुधवारी फक्त मदनलालच रिंगमध्ये उतरला. आतापर्यंत या स्पर्धेत भारताकडून शिव थापा ९५६ किलो गट), विकास कृष्ण (७५ किलो) हे दोघेच दुसऱ्या फेरीत पोहोचले आहे. (वृत्तसंस्था)
मदनलालचे आव्हान संपुष्टात
By admin | Updated: October 8, 2015 04:12 IST