शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

केनियन धावपटूंचे वर्चस्व; भारतीयांमध्ये पाल बंधू चमकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पहिल्या महाराष्टÑ पोलीस आंतरराष्टÑीय मॅरेथॉनवर केनियन खेळाडूनी वर्चस्व राखले. ४२ किलोमीटरच्या आंतरराष्टÑीय पुरुष गटात ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पहिल्या महाराष्टÑ पोलीस आंतरराष्टÑीय मॅरेथॉनवर केनियन खेळाडूनी वर्चस्व राखले. ४२ किलोमीटरच्या आंतरराष्टÑीय पुरुष गटात त्यांच्या स्टीफन किपचिर्चीने, तर महिला गटात शायलीन जेपकोरीरने विजेतेपद पटकाविले. त्यासाठी त्यांनी अनुक्रमे २ तास १७ मिनिटे ३९ आणि २ तास ४१ मिनिटे व ५८ सेंकदात अशी वेळ दिली.

भारतीय गटात राहुल पाल आणि त्याचा भाऊ अभिषेक पाल अनुक्रमे पूर्ण व अर्ध मॅरेथॉनमध्ये विजेते ठरले. महिला गटात ज्योती गवते व कविता यादव यांनी बाजी मारली. रितू पाल तिसरी आली.

पोलीस दलाच्या वतीने पहिल्यांदाच झालेल्या या मॅरेथॉनमध्ये राज्य पोलीस दलातील दीड हजारावर अधिकारी, अंमलदारांसह देशभरातील तब्बल १७ हजार ६०० जण त्यामध्ये सहभागी होते. गेटवे ते बीकेसी व्हाया वरळी सी-लिंक या मार्गावर रंगलेल्या मॅरेथॉनमध्ये अबालवृद्ध सहभागी होते. पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, अप्पर महासंचालक (अस्थापना) संजीव सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी शर्यतीचे संचालक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

पुर्ण मॅरेथॉनमध्ये पुरुषाच्या गटात केनियाचे डोमिनिक कांगोर आणि इथिओपियन झीक डेबे यांनी अनुक्रमे द्वितीय व तिसरा क्रमांक पटकाविला. महिला गटामध्ये केनियाची ग्लडिस केंबोई व भारताची ज्योती गवते दुसरी व तिसरी आली.भारतीय पुरुष गटात राहुल पालने २ तास २९ मिनिटे ४४ सेंकदामध्ये अंतर पुर्ण करीत पहिला क्रमांक पटकाविला. त्याच्याहून केवळ एक सेंकदाने नवीन हूडाला मागे राहिला तर तिसरा आलेल्या सुखदेव सिंगने २ तास २९ मिनिटे, ५३ सेंकद इतकी वेळ घेतली.महिलांमध्ये ज्योती गवतेने २.५४.१६ अशी वेळ नोंदवित अव्वल स्थान मिळविले. श्यामली सिंग (२.५९.५६) आणि रितू पाल (३.१५.४६) यांनी अनुक्रमे द्वितीय व तिसरी आली. अर्ध मॅरेथॉन कविता यादवने जिंकताना १ तास २० मिनिटे अशी वेळ दिली. किरण सहदेव आणि आरती पाटील द्वितीय व तृतीय आल्या.मॅरेथॉनवर बहिष्कारनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात नागपाडा येथे महिलांनी आंदोलन पुकारले असून आंदोलनाच्या छायाचित्रणाठी गेलेल्या एका छायाचित्रकाराला घटनास्थळावरील पोलीसांकडून धक्काबुक्की, माराहाण झाली होती. त्यामुळे याप्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात यावी; अशी मागणी छायाचित्रकारांकडून होत होती. मात्र काहीच कारवाई होत नसल्याने या घटनेचा निषेध म्हणून रविवारी या मॅरेथॉनवर बॉम्बे न्यूज फोटोग्राफर्स असोसिएशनसह पत्रकारांच्या विविध संघटनांनी बहिष्कार टाकला होता.सन्मानचिन्हासाठी स्पर्धकांची झुंबडमॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक धावपटूला सन्मानचिन्ह देण्यात आले. मात्र त्याचे वितरणाचे नियोजनात त्रुटी राहिल्यामुळे अनेकांना ती मिळाली नाहीत. वितरणाच्या ठिकाणी गर्दी करीत अनेकांनी स्वत:च्या हाताने ५,५,१०,१० पदके घेवून गेल्याने ती संपली. अखेर विशेष महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी सहभागी पोलिसांनी त्यांच्या पोलीस ठाण्यामध्ये पाठविली जाण्याचे जाहीर करीत राग शांत केला.