शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पदकांबद्दल भाकिते वर्तवण्याची घाई नको!

By admin | Updated: August 6, 2016 03:43 IST

आॅलिम्पिकचा उल्लेख येताच माझ्या डोळ्यांसमोर येते ते १९८०चे मॉस्को आॅलिम्पिक. त्या वेळी मी १६ वर्षांची होते.

आॅलिम्पिकचा उल्लेख येताच माझ्या डोळ्यांसमोर येते ते १९८०चे मॉस्को आॅलिम्पिक. त्या वेळी मी १६ वर्षांची होते. धावपटू म्हणून पहिल्यांदा १०० मीटर दौडीत सहभागी झाले होते. त्या वेळी हिटमध्येच बाहेर झाले; पण ही संधी मिळाल्यामुळेच मी पुढे १९८४च्या लॉस एंजलिस आॅलिम्पिकमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करू शकले. सेकंदाच्या शंभराव्या भागाच्या फरकाने भारत पहिल्या पदकापासून कसा वंचित राहिला, हे सर्वांना माहीत आहे. १९८८च्या आॅलिम्पिकमध्ये मी आऊट आॅफ फॉर्म होते. त्यानंतरही आॅलिम्पिक पदकाचे माझे स्वप्न कायम आहे. त्यामुळे मी युवा प्रतिभेचा शोध घेण्यासाठी ‘उषा स्कूल आॅफ अ‍ॅथलेटिक्स’ सुरू केले आहे.यंदा मोठ्या संख्येने अ‍ॅथलिट रिओसाठी पात्र ठरले, याबद्दल मी आनंदी आहे. आता खेळाडूंनी कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे भारतीय अ‍ॅथलिट चांगली कामगिरी करू शकतात, हा संदेश जाईल. रिओमध्ये भारताला अ‍ॅथलेटिक्सचे पदक मिळेल,ा का, असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. माझे उत्तर असे, की अ‍ॅथलेटिक्सच नव्हे, तर अन्य कुठल्याही खेळात भारतीयांच्या पदकाबद्दल भाकिते करण्याची घाई नकोच. माझ्यासाठी तर अ‍ॅथलिट कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करू शकले किंवा राष्ट्रीय विक्रम सुधारू शकले, तरी मोठी उपलब्धी ठरेल. भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये महिला खेळाडूंची भरारी फारच समाधानकारक आहे. रिओमध्ये काही महिला खेळाडू फायनलपर्यंत प्रवास करू शकतात.ललिता बाबर, सुधासिंग आणि टिंटू लुका या क्रमश: ३,००० मीटर स्टिपलचेस तसेच ८०० मीटरची अंतिम फेरी गाठू शकतील. फायनलच्या दिवशी त्यांची कामगिरी कशी होते, यावर भारताच्या पदकाची आशा अवलंबून असेल. पुरुष तिहेरी उडी, पुरुष व महिला थाळीफेक, चार बाय ४०० मीटर रिले यांमध्ये भारतीय खेळाडू अंतिम फेरीपर्यंत धडक देऊ शकतात. मला रिले संघाकडून राष्ट्रीय विक्रम मोडीत निघण्याची आशा आहे. पायी चालण्याच्या शर्यतीतही लंडनसारखीच कामगिरी रिओत होईल, अशी आशा आहे. माझ्यानंतर शंभर मीटरमध्ये पात्र ठरणारी द्यूतीचंद हिचा उल्लेख होणे क्रमप्राप्त आहे. ती सध्या फॉर्ममध्ये आहे. हिटमध्ये ११.२० पेक्षा कमी वेळ नोंदविण्यात तिला यश आले, तर सेमीफायनलसाठी ती पात्र ठरेल. ही भारताच्या दृष्टीने मोठी उपलब्धी असेल. (टीसीएम)