शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

जोकोविच, नदाल उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: May 20, 2017 03:18 IST

क्ले कोर्टचा बादशहा राफेल नदाल आणि द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविच यांनी सरळ सेटस्मध्ये विजय नोंदवताना रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली

रोम : क्ले कोर्टचा बादशहा राफेल नदाल आणि द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविच यांनी सरळ सेटस्मध्ये विजय नोंदवताना रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली; परंतु स्टॅन वावरिंका याचे मात्र आव्हान संपुष्टात आले.गतवर्षी अंतिम फेरीत ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरे याला पराभूत करणाऱ्या जोकोविचने स्पेनच्या रॉबर्टो बातिस्ता आगूट याचा ६-४, ६-४ असा पराभव केला. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्याला अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रो याच्याशी दोन हात करावे लागतील. मार्टिनने सातव्या मानांकित जपानच्या केई निशीकोरी याच्यावर ७-६, ६-३ असा विजय मिळवला. फ्रेंच ओपनआधी सुरेख लय सापडलेल्या राफेल नदालने क्ले कोर्टवर आपले वर्चस्व राखले. त्याने अमेरिकेच्या १३ व्या मानांकित जॅक सोक याच्यावर ६-३, ६-४ अशी मात केली. - नदालची पुढील लढत आॅस्ट्रियाच्या आठव्या मानांकित डोमेनिक थीम याच्याशी होईल. थीमने अमेरिकेच्या सॅम क्वेरी याचे आव्हान ३-६, ६-३, ७-६ असे मोडीत काढले.- नदाल आणि जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरल्यास ते उपांत्य फेरीत आमने-सामने येऊ शकतात. बोपन्ना, कुइवास रोम मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत...रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार पाब्लो कुइवास यांनी फेलिसियानो लोपेज आणि मार्क लोपेज या सातव्या मानांकित जोडीचा पराभव करीत रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. बोपन्ना आणि कुइवास यांनी दुसऱ्या फेरीच्या चुरशीच्या लढतीत या स्पॅनिश जोडीचा ४-६, ७-६, १0-८ असा पराभव केला. १ तास ३९ मिनिटे रंगलेल्या या लढतीत बोपन्ना आणि कुइवास जोडीला ब्रेक पॉइंट प्राप्त करण्याची तीनदा संधी मिळाली; परंतु यापैकी ते एकाही संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत.त्यांनी पहिल्या सेटमध्ये एकदा आपली सर्व्हिस गमावली. या जोडीची पुढील फेरीतील लढत पीयरे ह्यूज हरबर्ट आणि निकोलस माहूट या चौथ्या मानांकित जोडीशी होईल. महिला गटात सानिया मिर्झा आणि यारोस्लावा श्वेदोवा ही तृतीय मानांकित जोडी उपांत्यपूर्व फेरीत सारा इरानी आणि मार्टिना ट्रेविसान यांच्याविरुद्ध खेळेल.- महिला गटात व्हीनस विल्यम्सने ब्रिटनच्या योहाना कोंटा हिचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-१, ३-६, ६-१ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता तिची पुढील लढत स्पेनच्या गार्बाइन मुगुरुजा हिच्याशी होईल. रशियाच्या सातव्या मानांकित स्वेटलाना कुजनेत्सोवा हिला आॅस्ट्रेलियाची क्वॉलिफायर डारिया गावरिलोवा हिच्याकडून २-६, ७-५, ६-४ असा पराभव पत्करावा लागला.