पॅरीस : ग्रॅण्डस्लॅमचा धुरंधर म्हणून ओळखला जाणारा सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि ब्रिटनचा अॅण्डी मरे यांनी अनुक्रमे उदयोन्मुख खेळाडू थानासी कोकिनकिस आणि निक किर्गियोस यांचा धुव्वा उडवत फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. जगातील नंबर वनचा टेनिसपटू आणि अव्वल मानांकित जाकोवीचने सलग सहाव्या वर्षी अंतिम १६ खेळाडूंमध्ये प्रवेश केला. त्याने १९ वर्षीय आॅस्ट्रेलियाच्या कोकिनकिसचा ६-४, ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. त्याची पुढील लढत आता दक्षिण आफ्रिकेच्या १५ व्या मानांकित केविन अॅडरसन किंवा फ्रान्सच्या २० व्या मानांकित रिचर्ड गास्केतविरुद्ध होणार आहे.दुसरीकडे, तिसऱ्या मानांकित ब्रिटनच्या अॅण्डी मरे याने आॅस्ट्रेलियाच्या किर्गियोसवर ६-४, ६-२ आणि ६-३ ने मात केली. त्याची पुढील लढत आता फ्रान्सचा बिनमानांकित जेरेमी चार्डी याच्याविरुद्ध होईल. जेरेमी याने बेल्जियमच्या १७ व्या मानांकित डेव्हिड गोफेनचा ६-३, ६-४ आणि ६-२ ने पराभव केला.महिला गटात, विम्बल्डन चॅम्पियन पेत्रा क्वितोव्हा अंतिम १६ मध्ये पोहचली आहे. चौथी मानांकित चेक गणराज्यची क्वितोव्हाने रोमानियाच्या इरिना कामेलिया बेगू हिचा ६-३, ६-२ ने पराभव केला. आता तिचा सामना स्वित्झर्लंडच्या टिमिया बसिनज्की या अमेरिकेच्या मेडिसन किस हिच्याविरुद्ध होणार आहे. क्रोएशियाच्या नवव्या मानांकित मारिन सिलीचने अर्जेंटिनाच्या २३ व्या मानांकित लिएड्रो मायेर हिचा ६-३, ६-२ आणि ६-४ ने पराभव केला. अन्य लढतीत, इटलीच्या सारा इराणीने जर्मनीच्या आंद्रीया पेत्कोविचचा ६-३, ६-३ ने पराभव केला.पुरुष गटात सहावा मानांकित राफेल नदालने ए. कुजनेटसोचा ६-१, ६-३,६-२ असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात ए. व्हॅन उत्वेंकाने मालडेनोव्हिकला ६-४, ६-१ असे नमविले.विसंवादामुळे निर्माण झाला वाद : एएफआयनवी दिल्ली : भारतीय एथलेटिक्स महासंघाने १०० मीटर पुरूष ट्रायल रिलेत झालेला वाद हा विसंवादामुळे निर्माण झाला असल्याचे मान्य केले आहे. प्रवीण मुथुकुमारन याच्या ऐवजी मानिकांदा अरुमगम याला स्पर्धेसाठी उतरवण्यात आल्यावर हा वाद सुरू झाला होता.बंगळुरू येथे झालेल्या स्पर्धेत अरुमगमने अखेरच्या फेरीत चांगला प्रदर्शन केले होते. त्याने ३९.०६ सेकंदांची वेळ नोंदवली होती. मात्र एएफआयने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीत अरुमगम याचे नाव नव्हते. महासंघाचे अधिकारी याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाही. महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषकुमार म्हणाले की, आम्ही या घटनेचा स्विकार करतो. मात्र हा प्रकार विसंवादामुळे घडला आहे. यात कोणाबाबतही दुराग्रह नाही. अश्विनी, मनदीपचा टीओपीत समावेश, मात्र संघात जागा नाहीडोपींगमुळे कलंकीत खेळाडू अश्विनी अकुंजी, मनदीप कौर यांना काही दिवस आधी सरकारच्या आकर्षक अशा टीओपी योजनेत सहभागी करून घेण्यात आले आहे. मात्र या रिले धावपटूंना वुहान मध्ये होणाऱ्या अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी ४७ सदस्यांच्या भारतीय संघात जागा देण्यात आली नाही.
जोकोविच, मरेची आगेकूच
By admin | Updated: May 31, 2015 01:28 IST