शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

डिव्हिलियर्स-विराटचे झिंग.. झिंग... झिंगाट

By admin | Updated: May 15, 2016 04:38 IST

ख्रिस जॉर्डनचा (४-११) अचूक मारा याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने शनिवारी विक्रमांनी गाजलेल्या लढतीत गुजरात लायन्सचा १४४ धावांनी एकतर्फी पराभव केला.

बंगळुरू : कर्णधार विराट कोहली (१०९) आणि एबी डिव्हिलियर्स (नाबाद १२९) यांच्या वैयक्तिक शतकी खेळीनंतर ख्रिस जॉर्डनचा (४-११) अचूक मारा याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने शनिवारी विक्रमांनी गाजलेल्या लढतीत गुजरात लायन्सचा १४४ धावांनी एकतर्फी पराभव केला. संघासाठी महत्त्वाच्या असलेल्या लढतीत बँगलोरने निर्धारित २० षटकांत ३ बाद २४८ धावांची दमदार मजल मारली. स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर यजमान संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करताना प्रतिस्पर्धी गुजरात संघाचा डाव १८.४ षटकांत १०४ धावांत गुंडाळला. गुजराततर्फे अ‍ॅरोन फिंचने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. बँगलोरतर्फे जॉर्डनने ११ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले, तर युजवेंद्र चहलने १९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. त्याआधी, विराट व डिव्हिलियर्स या जोडीने १६ षटकांत दुसऱ्या विकेटसाठी २२९ धावांची द्विशतकी भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासात ही कुठल्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. ख्रिस गेल (६) स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार विराटने ५५ चेंडूंना सामोरे जाताना १०९ धावांची खेळी केली. त्यात पाच चौकार व ११ षटकारांचा समावेश आहे. दुसऱ्या टोकावरून डिव्हिलियर्सने ५२ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १२९ धावा फटकावल्या. त्यात १० चौकार व १२ षटकारांचा समावेश आहे. त्याने ४३ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. (वृत्तसंस्था)01 एका टष्ट्वेंटी-२0 सामन्यात दोघांनी शतके करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी अशी घटना २0११ मध्ये झाली होती. केव्हीन ओ’ब्रायन (११९) आणि हाशिम मार्शल (१0२) या दोघांनी ग्लुसेस्टरशायर संघाकडून मिडलसेक्स संघाविरुद्ध दोन शतके झळकावली होती.05वेळा ए. बी. डिव्हिलियर्सने यंदाच्या आयपीएलमध्ये पन्नाशीचा आकडा पार केला आहे. २00९ मध्ये त्याने चार वेळा पन्नाशी पार केली होती. यापैकी एकदा शतक गाठले.बंगळुरू : भारतीय क्रिकेटचा चेहरा म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या विराट कोहलीने शनिवारी त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्सतर्फे तिसऱ्यांदा शतकी खेळी केली. या चमकदार कामगिरीसह विराटने आयपीएल स्पर्धेत एका मोसमात सर्वाधिक शतके ठोकण्याचा पराक्रम केला. बँगलोरसंघाचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी त्यांच्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या लढतीत वैयक्तिक शतके ठोकली. आक्रमक फलंदाजी करताना या खेळाडूंनी अनेक विक्रम नोंदवले. ५ बाद २६३ धावांची सर्वोच्च खेळीही याच संघाच्या नावावर आहेविराटने शनिवारी खेळल्या गेलेल्या लढतीत बँगलोरतर्फे १०९ धावांची खेळी केली. यंदाच्या आयपीएल मोसमात विराटची ही तिसरी शतकी खेळी आहे. विराटने यापूर्वी रायझिंग पुणे सुपरजायन्ट््सविरुद्ध नाबाद १०८ व गुजरातविरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी केली होती. आयपीएलच्या एका मोसमात ३ शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. या व्यतिरिक्त एकाच डावात २ फलंदाजांनी शतके ठोकण्याचा आयपीएलच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे.संक्षिप्त धावफलकरॉयल चॅलेंजर्स बँगलोर : ख्रिस गेल त्रि. गो. कुलकर्णी ०६, विराट कोहली झे. ब्राव्हो गो. प्रवीण कुमार १०९, एबी डिव्हिलियर्स नाबाद १२९, शेन वॉटसन झे. कार्तिक गो. प्रवीण कुमार ००. अवांतर (४). एकूण २० षटकांत ३ बाद २४८. गोलंदाजी : प्रवीण कुमार ४-१-४५-२, कुलकर्णी ३-०-३३-१.गुजरात लायन्स : ड्वेन स्मिथ त्रि. गो. अरविंद ०७, ब्रेन्डन मॅक्युलम झे. डिव्हिलियर्स गो. चहल ११, रवींद्र जडेजा झे. व गो. जॉर्डन २१, दिनेश कार्तिक झे. डिव्हिलियर्स गो. जॉर्डन ०२, अ‍ॅरोन फिंच झे. अरविंद गो. सचिन बेबी ३७, ड्वेन ब्राव्हो पायचित गो. चहल ०१, अक्षदीप नाथ त्रि. गो. चहल ०३, प्रवीण कुमार त्रि. गो. जॉर्डन ०१, धवल कुलकर्णी त्रि. गो. जॉर्डन ०२, प्रवीण तांबे नाबाद ०७, शिविल कौशिक झे. अरविंद गो. सचिन बेबी ००. अवांतर (१२). एकूण १८.४ षटकांत सर्वबाद १०४. गोलंदाजी : अरविंद ३-०-१५-१, चहल ४-०-१९-३, जॉर्डन ३-०-११-४, सचिन बेबी ०.४-०-४-२.