शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 06:14 IST

लहानपणापासूनच मला खेळांमध्ये खूप रस. विशेषतः फुटबॉलमध्ये. वडिलही शाळेत खेळाडू होते, पण पैशाच्या अभावामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. - हिमा दास

हिमा दास, धावपटू

साममधील नागांव जिल्ह्यात कांधुलिमारी या अत्यंत लहान गावात जन्म झाला. माझे आई आणि वडील दोघंही भातशेती करणारे शेतकरी होते. त्यांना आर्थिक परिस्थितीने त्यांचे स्वप्न पूर्ण करता आली नाहीत. तेव्हा आम्ही एकत्र कुटुंबात राहायचो. कधीच पुरेसे पैसे नसत.

जगण्यासाठी लागणाऱ्या साधनांचीही कमतरता होती. पण या सगळ्यात आई-वडिलांनी नेहमीच मला सांगितले की, 'जे आहे, त्यात सर्वोत्तम दे.'लहानपणापासूनच मला खेळांमध्ये खूप रस. विशेषतः फुटबॉलमध्ये. वडिलही शाळेत खेळाडू होते, पण पैशाच्या अभावामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. त्यामुळे ते मला शक्य तेवढे खेळायला मदत करत आले. काही दिवस तर माझ्याकडे बूट घ्यायलाही पैसे नव्हते, खेळण्यासाठी योग्य मैदान नव्हते म्हणून मी चिखल, शेतात सराव करत असे.

एकदा शाळेत शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी मला खेळताना पाहिले. ते माझ्या धावण्याच्या वेगाने खूप प्रभावित झाले. त्यांनी मला फुटबॉलऐवजी धावपटू होण्यास सांगितले. तसेच प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली. पुढे जिल्हास्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेतला. मला आधी थोडी भीती वाटली. माझ्या परिस्थितीमुळे मी इतरांपेक्षा मागे पडेल की काय, अशी शंकाही होती. पण सर्व शंका दूर झाल्या.

दोन प्रशिक्षकांनी माझी क्षमता ओळखली. त्यांनी मला आसाममधल्या त्यांच्या कॅम्पमध्ये सहभागी होण्यास सांगितले. तेथे सुरू झाला संघर्ष, खडतर प्रशिक्षण आणि खूप काटेकोर दिनचर्या. पहाटे उठायचं, काही तास ट्रेनिंग, पुन्हा संध्याकाळी ट्रेनिंग. मी १७ वर्षांची होते. हे संघर्षाचे दिवस कसे हाताळायचे हा प्रश्न होता. पण वडिलांनी मला सांगितले, ‘हे छोटे छोटे संघर्षच तुला तुझ्या मोठ्या स्वप्नाकडे घेऊन जातील. एक दिवस तू देशासाठी खेळशील, तेव्हा हे सगळं सार्थ वाटेल.’

परिस्थिती कशीही असो या तीन गोष्टी तुमच्याकडे हव्याचडोंगर चढून सर्वोच्च शिखरावर पोहोचायची जिद्द असते, तेव्हा तुम्ही कोण आहात, तुमची परिस्थिती कशी आहे, त्याने फरक पडत नाही. तुमच्याकडे फक्त या तीन गोष्टी पाहिजेत.१)     निश्चय : जो तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे सतत खेचतो.२)     प्रयत्न : जे सतत चालू ठेवले, तर कोणतंही अशक्य काम शक्य होतं.३)     स्वतःवरचा विश्वास : जो तुम्हाला अंधारातही मार्ग दाखवतो.हिमा दास ही भारतीय धावपटू असून २०१८ मध्ये वर्ल्ड अंडर-२० मध्ये तिने सुवर्ण जिंकले. ती राष्ट्रीय विक्रमधारक असून ढिंग एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध आहे.-संकलन : महेश घोराळे

टॅग्स :Hima Dasहिमा दास