शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा धोनी स्वत:च स्वीकारेल निवृत्ती - हेडन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 13:06 IST

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघातील धोनीचा सहकारी मॅथ्यू हेडन याने धोनीच्या निवृत्तीवरून विरोधकांना टोला लगावला आहे

ऑनलाइन लोकमत
चेन्नई. दि. 19 -  भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकत आपले लक्ष केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर केंद्रीत केले आहे. फलंदाजी आणि यष्टीरक्षणात त्याची कामगिरी युवा खेळाडूंना तोडीस तोड होत आहे. मात्र तरीही त्याला निवृत्तीचे सल्ले देणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र धोनीमध्ये अद्याप बरेच क्रिकेट बाकी असून, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तो स्वत:च क्रिकेटपासून दूर जाईल, असे सांगत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघातील धोनीचा सहकारी मॅथ्यू हेडन याने धोनीच्या विरोधकांना टोला लगावला आहे.
 तामिळनाडू क्रिकेट लीगच्या प्रसिद्धीसाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या हेडनला त्याचा संघसहकारी आणि अव्वल यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टने ज्याप्रमाणे एक झेल सुटल्यावर निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे धोनीही निवृत्ती स्वीकारणार का असे विचारण्यात आले. त्यावेळी हेडन म्हणाला, " पाण्याच्या ग्लासात नाणी टाकत जावी तसे क्रिकेटपटूचे जीवन असते. त्यात अशी एक वेळ येते जेव्हा एक अजून नाणे टाकले की पाणी बाहेर येते. गिलख्रिस्ट असाच खेळाडू होता. त्याचप्रमाणे धोनीला जेव्हा वाटेल की आता निवृत्ती स्वीकारण्याची वेळ आली आहे. तेव्हा तो स्वत:च निवृत्तीचा निर्णय जाहीर करेल., पण एक खेळाडू म्हणून अद्यापही तो सामन्याचा निकाल बदलवू शकतो." अधिक वाचा( वॉर्नर, गेल, पोलार्ड आणि धोनीला बदलावी लागणार "बॅट" )( ‘तो’ निर्णय धोनीलाच घेऊ द्या : साहा )( Happy Birthday एम.एस.धोनी ! जाणून घ्या माहीच्या या खास गोष्टी )
यावेळी हेडनने विराट कोहलीच्या कप्तानीबाबतही आपले मत मांडले. "विराट कोहली भारतीय संघाचे भविष्य आहे. मला त्याची आक्रमकता भावते. तो असा खेळाडू आहे जो कोणत्याही मोठ्या सामन्यात आपली कामगिरी, नेतृत्व क्षमता आणि खेळाविषयीच्या ज्ञानाची चुणूक दाखवी शकतो. हे गुण त्याला असा खेळाडू बनवतात ज्याच्यावर विश्वास टाकता येऊ शकेल." असे हेडनने सांगितले.  
बंदी उठल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जला संघात हवाय धोनी
आयपीएलमधून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे पुढील हंगामात स्पर्धेत पुनरागमन होणार आहे. आता स्पर्धेत पुनरागमन करताना संघाची ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपरकिंग्जला आपल्या संघात हवा आहे. परवानगी मिळाल्यास धोनीला संघात कायम ठेवण्याचा चेन्नई सुपरकिंग्जचा प्रयत्न आहे.