शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
4
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
5
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
6
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
7
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
8
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
9
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
10
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
11
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
12
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
13
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
14
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
15
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
16
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
17
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
18
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
19
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...

धोनी म्हणतो, मी आहे जुन्या मद्याप्रमाणे !

By admin | Updated: July 1, 2017 17:16 IST

महेंद्रसिंह धोनी स्वतःला एखाद्या जुन्या मद्याप्रमाणे मानतो, ज्याची चव वेळेसोबत अधिकाधिक उत्तम होत जाते, असे त्यानं स्वतः म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - महेंद्रसिंह धोनी स्वतःला एखाद्या जुन्या मद्याप्रमाणे मानतो, ज्याची चव वेळेसोबत अधिकाधिक उत्तम होत जाते,  असे त्यानं स्वतः म्हटले आहे.  भारताने तिस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करत सीरिजमध्ये 2-0 ची आघाडी घेतली. भारताने 93 धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला. भारताच्या या विजयात महत्वाचा वाटा उचलला तो महेंद्रसिंग धोनीने.
 
धोनीनं वेस्ट इंडिजविरोधातील सामन्यात 79 चेंडूंमध्ये 78 धावांची जबरदस्त खेळी खेळली.  टीम इंडियाचे तीन फलंदाज तब्बूत परतल्यानंतर धोनीनं संयम राखत शानदार 78 धावा केल्या व भारताला विजय मिळवून दिला. त्याच्या या धावा भारताच्या विजयासाठी मोलाच्या ठरल्या आहेत. यावेळी धोनीला त्याच्या खेळीसंदर्भात विचारले असते, त्यानं "मी जुन्या मद्याप्रमाणे आहे", असे मिश्लिक उत्तर दिले. 
 
पुढे धोनीनं असेही म्हणाला की, गेल्या जवळपास एक-दीड वर्षात आमच्या वरची फळीच अधिक धावा करत आहेत, तेव्हा अशी संधीमध्ये धावा करायला मिळणं चांगलं वाटतं. दरम्यान, भारताच्या विजयासोबतच धोनीने नव्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. वेस्ट इंडिजविरोधात 78 धावांची खेळी करणा-या धोनीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकलं आहे. धोनी आता कर्णधार नसतानाही अझरुद्दीनचा कोणता रेकॉर्ड मोडला असा विचार करत असाल तर तो आहे धावांचा.
 
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जास्त धावा करणा-या खेळाडूंच्या यादीत धोनीने अझरुद्दीनला मागे टाकलं आहे. धोनीने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून अझरुद्दीनचा रेकॉर्ड मोडला आहे. मोहम्मद अझरुद्दीनने 334 एकदिवसीय सामने खेळताना 308 खेळींमध्ये एकूण 9378 धावा केल्या आहेत. 36.92 च्या सरासरीने मोहम्मद अझरुद्दीनने या धावा केल्या. तर इकडे धोनीने आतापर्यंत 294 एकदिवसीय सामन्यांत 254 खेळींमध्ये 51.31च्या सरासरीने 9442 धावा केल्या आहेत. धोनीचा स्ट्राईक रेट 89.14 इतका आहे. 
 
सर्वाधिक धावा करणा-यांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सर्वात पुढे आहे. सचिन तेंडूलकरने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये एकूण 18426 धावा केल्या आहेत. सचिनने उभा केलेला धावांचा हा डोंगर कोणत्याही खेळाडूला सहजासहजी पार करणं शक्य होणार नाही. सचिन तेंडूलकरनंतर भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि मिस्टर डिपेंडेबल राहुल द्रविडचा समावेश आहे. सौरभ गांगुलीने एकूण 11221 तर राहुल द्रविडने 10768 धावा केल्या आहेत. 
 
धोनीच्या नावे अजून एक रेकॉर्डची नोंद आहे. आतापर्यंत 70 वेळा महेंद्रसिंग धोनी नाबाद राहिला आहे. नाबाद राहण्यामध्ये आता धोनी फक्त दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॉक आणि श्रीलंकेचा माजी गोलंदाज चामिंडा वासच्या मागे आहे. दोघेही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 72 वेळा नाबाद राहिले आहेत. 
 
तिस-या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा 93 धावांनी पराभव केला आहे. खडतर परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने केलेल्या 78 धावा आणि डावाच्या अखेरीस केदार जाधवने (26 चेंडूत 40 धावा) केलेल्या फटकेबाजीच्या बळावर  भारताने वेस्ट इंडिजला 252 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने दिलेल्या 252 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 38.1 षटकांत केवळ 158 धावांमध्येच गारद झाला. 
 
भारताकडून फिरकी गोलंदाज आर.अश्विन आणि कुलदिप यादव यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. वेस्ट इंडिजकडून जेसन मोहम्मद याने सर्वाधिक 40 तर रोमॅन पॉवेल याने 30 धावांची खेळी करून थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला पण इतर फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. या विजयासोबतच भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अशी विजयी आघाडी घेतली आहे. महेंद्रसिंग धोनीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.  दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.