शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

धोनी, विराट भिन्न शैलीचे कर्णधार

By admin | Updated: January 9, 2016 03:24 IST

महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती असून, त्यांची नेतृत्वशैलीही वेगवेगळी आहे, असे मत भारताचा स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने व्यक्त केले.

नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती असून, त्यांची नेतृत्वशैलीही वेगवेगळी आहे, असे मत भारताचा स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने व्यक्त केले. जागतिक क्रमवारीत कसोटीमध्ये अव्वल गोलंदाज व अष्टपैलू असलेल्या आश्विनने धोनी आणि विराट यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना सांगितले की, ‘अन्य कर्णधारांच्या तुलनेत धोनीमध्ये अधिक चर्चा न करणे आणि प्रतिक्रिया न देणे हा एक विशेष गुण आहे. अनेकदा आम्ही त्याच्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा करतो, पण तो काही न बोलता थेट ड्रेसिंग रूममध्ये जातो. ही त्याची विशेषता आहे. त्याला समजून घेणे कठीण आहे. हे त्याचे वर्तन योग्य आहे किंवा नाही, हे माहीत नाही पण ही त्याची विशेषता आहे.’एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आश्विनने विराटबाबत बोलताना म्हटले की, ‘विराट कोहलीमध्ये कमालीचा उत्साह असतो. कर्णधारपदाच्या छोटेखानी कारकिर्दीमध्ये तो सातत्याने चांगले करण्यास उत्सुक असतो आणि सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रेरित करतो. त्याच्याबाबत सर्वकाही चांगलेच आहे.’आपल्या गोलंदाजीबाबत बोलताना आश्विन म्हणाला,‘मी नेहमी जगातील सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून नावलौकिक मिळविण्यास प्रयत्नशील होतो. ही चांगली बाब असली, तरी माझ्या मते मला अद्याप लक्ष्य गाठता आलेले नाही. जोपर्यंत लक्ष्य गाठत नाही, तोपर्यंत त्यासाठी प्रयत्नशील राहील. मी एक दिवस नक्कीच हा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरेल, पण सध्या मानांकनाचा विचार करता अव्वल स्थानावर असल्यामुळे आनंदी आहे.’आश्विनने गेल्या वर्षी ९ कसोटी सामन्यांत ६२ बळी घेतले आणि वर्षाचा शेवट ‘नंबर वन कसोटी गोलंदाज’ म्हणून केला. बिशनसिंग बेदीनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. बेदी यांनी १९७३ मध्ये अशी कामगिरी केली होती. शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांना आपला आदर्श मानणाऱ्या आश्विनने सांगितले की,‘हे दोन्ही गोलंदाज माझ्यासाठी ‘हिरो’ आहेत. मी त्यांच्यादरम्यान तुलना करू शकत नाही, पण जर मला हजार डॉलर्स देऊन एखाद्या गोलंदाजाला बघायला जायचे असते तर मी वॉर्नला बघणे पसंत करील. कारण, तो ९ क्षेत्ररक्षकांना एकाचवेळी सांभाळणारा शानदार गोलंदाज आहे. अन्य गोलंदाजांमध्ये अशी प्रतिभा नाही.’ (वृत्तसंस्था)