शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

विकासचा ‘स्टार’ थ्रो

By admin | Updated: October 1, 2014 02:03 IST

अव्वल थाळीफेकपटू विकास गौडाच्या रौप्यपदकासह भारताने 17 व्या आशियाई स्पर्धेत मंगळवारी चार पदकांची कमाई केली.

इंचियोन : अव्वल थाळीफेकपटू विकास गौडाच्या रौप्यपदकासह भारताने 17 व्या आशियाई स्पर्धेत मंगळवारी चार पदकांची कमाई केली.   भारताची वर्षा गौतम आणि एश्वर्या नेदुनचेङिायान जोडीने 12 पैकी एक शर्यतीत बाद होऊन सुध्दा टू पर्सन डिंगी सेलिंग स्पर्धेत कांस्यपदकावर आपला हक्क प्रस्तपित केला. ृ
विकास गौडा आज भारतातर्फे सवरेत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला.   एल. सरिता देवी (6क् किलो) व पूजा राणी (75 किलो) यांना उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. वर्षा गौतम व ऐश्वर्या नेदुनचेङिायान यांनी सेलिंगमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. 
भारतीय पुरुष हॉकी संघाने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा 1-क् ने पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली. बॉक्सिंगमध्ये पाचवेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणारी भारतीय महिला बॉक्सर एम.सी. मेरीकोमने (51 किलो) अंतिम फेरीत धडक मारताना किमान रौप्यपदक निश्चित केले. टिन्टू ल्युकाने 8क्क् मीटर दौड स्पर्धेत फायनलसाठी पात्रता मिळविली. आज चार पदकांची कमाई करणा:या भारताने 6 सुवर्ण, 8 रौप्य व 31 कांस्यपदकांसह एकूण 45 पदकांची कमाई करीत पदकतालिकेत 1क् वे स्थान कायम राखले. चीन (254 पदके) अव्वल स्थानी कायम असून, त्यानंतर यजमान दक्षिण कोरिया (162 पदके) व जपान (141 पदके) यांचा क्रमांक आहे. 
विकास आज भारताचा स्टार ठरला. विकासने 62.58 मीटर थाळी फेक करीत रौप्यपदक पटकाविले. गौडाचा अपवाद वगळता अॅथ्लेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंना आज छाप सोडता आली नाही.  
सरिताच्या वादग्रस्त लढतीपूर्वी भारताची पदकाची दावेदार मेरीकोमने व्हिएतनामच्या लर थी बँगचा 3-क् ने धुव्वा उडवीत अंतिम फेरीत धडक मारली. मेरीकोमला आता कझाखस्तानच्या ङौना शेखरबेकोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शेखरबेकोव्हाने उपांत्य फेरीत मंगोलियाच्या एन. मेगमारदुलमचा 3-क् ने पराभव केला. बॉक्सिंगमध्ये पुरुष विभागातही भारताला आश्चर्यकारक निर्णयाला सामोरे जावे लागले. देवेंद्रोने उपांत्यपूर्व फेरीत स्थानिक खेळाडू शिन जोघुनविरुद्ध सर्व तिन्ही फे:यांमध्ये आऊंट पंच केल्यानंतरही त्याला पराभव स्वीकारावा लागला. 
व्हॉलिबॉलमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. पाचव्या ते आठव्या स्थानाच्या उपांत्य फेरीच्या प्ले ऑफ लढतीत भारताला कझाखस्तानविरुद्ध 3-क् ने पराभव स्वीकारावा लागला. भारताला आता सातव्या-आठव्या स्थानासाठी प्ले ऑफमध्ये खेळावे लागणार आहे. 
सुवर्णपदकाचा बचाव करण्याच्या निर्धाराने येथे दाखल झालेल्या भारतीय महिला कबड्डी संघाने दक्षिण कोरियाचा 45-26 ने पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसमध्ये अचंता शरत कमल व अॅन्थोनी अमलराज या अव्वल भारतीय जोडीने पुरुष दुहेरीच्या तिस:या फेरीत प्रवेश केला.  (वृत्तसंस्था)
 
मेरीकोमने कामगिरीत सातत्य राखताना अंतिम फेरीत प्रवेश केला. पूजा राणी (75 किलो) हिला उपांत्य फेरीत चीनच्या ली कियानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. बॉक्सिंगमध्ये आजचा दिवस निराशाजनक ठरला. सरिता देवीने वर्चस्व गाजविले असले तरी तिला उपांत्य फेरीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
 
सेलिंगमध्ये आज भारतासाठी चांगली वार्ता आहे. वर्षा गौतम व ऐश्वर्या नेदुनचेङिायान यांनी 12 रेसपैकी एकमध्ये अपात्र ठरल्यानंतरही महिला टू पर्सन डिंगी सेलिंग स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.