शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

दिल्लीचा दुष्यंत पहिलवान अव्वल, काटा कुस्ती दंगल, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती समारोह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:27 IST

शनिवार रात्री ११.४५ ची वेळ. अंगात हुडहुडी भरेल अशी थंडी. दोन तरणेबांड मल्ल हनुमान आखाड्याच्या हौदात एकमेकांशी दोन हात करीत होते. दिल्लीचा दुष्यंत पहिलवान आणि मराठमोळा कोल्हापूरचा श्रीपती कर्नाळ यांच्यात चुरस सुरू होती.

यवतमाळ : शनिवार रात्री ११.४५ ची वेळ. अंगात हुडहुडी भरेल अशी थंडी. दोन तरणेबांड मल्ल हनुमान आखाड्याच्या हौदात एकमेकांशी दोन हात करीत होते. दिल्लीचा दुष्यंत पहिलवान आणि मराठमोळा कोल्हापूरचा श्रीपती कर्नाळ यांच्यात चुरस सुरू होती. हलगी आणि तुतारीचा रणभेदी आवाज मल्लांसोबतच प्रेक्षकांचेही स्फुरण चढवीत होते. परंपरागत ‘मुलतानी’ व ‘बांगडी’ डाव पडला. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली.प्रेक्षक जागेवर उभे झाले. कोण जिंकणार अशी उत्सुकता लागली आणि तेवढ्यातच विजेच्या चपळाईने दुष्यंत पहिलवानाने एकेरी पट काढून श्रीपती पहिलवानाला आसमान दाखविले. काट्या कुस्त्याच्या दंगलीत दिल्लीच्या दुष्यंत पहिलवानाने ५१ हजार रुपयांचे पहिले बक्षीस पटकाविले.स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या हौदात काट्या कुस्त्यांच्या दंगलीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, हनुमान आखाड्याचे कंट्रोलर, माजी खासदार विजय दर्डा, एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, हनुमान आखाड्याचे मॅनेजर माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कुस्तीगीर संघाने काटा कुस्त्याच्या विराट दंगलीचे आयोजन केले होते. या स्पर्धेत दिल्ली, भिलाई, जबलपूर, मुंबई, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, हिंगोली, वर्धा, अकोला यांसह राज्याच्या विविध भागांतून ४०० ते ५०० मल्ल सहभागी झाले होते.अंतिम सामन्यात अव्वल ठरलेला दिल्लीचा दुष्यंत पहिलवान याला प्रशांत बाजोरियातर्फे प्रायोजित ५१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, प्रताप पारसकर, अनिल पांडे, सुरेश जयसिंगपुरे, दीपक ठाकूर, विलास महाजन यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. ४१ हजार रुपयांचा दुसरा पुरस्कार दिल्लीचा कुलदीप पहिलवान याने पटकाविला. या दंगलीत तिसºया क्रमांकाची कुस्ती काट्याची झाली. सुहास घाडगे पुणे विरुद्ध गजानन पहिलवान देवठाणा यांच्यात ही कुस्ती रंगली. पराभूत पहिलवान गजाननने पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत दहा मिनिटे हौद सोडला नाही. गुणाच्या आधारावर सुहास पहिलवान याला विजयी करण्यात आले. त्याला ३१ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. २५ हजार रुपयांचे चौथे बक्षीस ऋषिकेश पहिलवान यांनी पटकाविले. पाचवा क्रमांक हिंगोलीच्या रामदास पहिलवानाने, सहावा क्रमांक दिगंबर पहिलवान (हिंगोली), सातवा क्रमांक श्रीराम पहिलवान (पुणे), आठव्या क्रमांकाची कुस्ती शेख नबीब (औरंगाबाद) याने जिंकली. नववा क्रमांक हरिंदर पहिलवान (दिल्ली), दहावा क्रमांक गणेश पहिलवान (हिंगोली) व अकरावा क्रमांक शंकर पहिलवान (यवतमाळ) यांनी पटकाविला.स्पर्धेदरम्यान माजी खासदार विजय दर्डा, हनुमान आखाड्याचे संचालक किशोर दर्डा यांनी भेट देऊन खेळाडूंचे मनोबल वाढविले. पंच म्हणून अनिल पांडे, महंमद शकील, उद्धव बाकडे यांनी कामगिरी केली. कुस्तीचे धावते समालोचन अरुण जाधव यांनी केले.

टॅग्स :Sportsक्रीडा