शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली रणजी

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

शार्दुलचा अचूक मारा, दिल्ली १६६ धावांत गारद

शार्दुलचा अचूक मारा, दिल्ली १६६ धावांत गारद
कटक : वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या अचूक माऱ्याच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दिल्ली संघाचा पहिला डाव १६६ धावांत गुंडाळला. ठाकूरने ५४ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. मुंबईच्या पहिल्या डावातील १५६ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना दिल्ली संघ १० धावांची निसटती आघाडी घेण्यात यशस्वी ठरला. आदित्य तारेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी मुंबई संघाने दुसऱ्या डावात १ बाद ८७ धावांची मजल मारली होती. मुंबई संघाकडे एकूण ७७ धावांची आघाडी असून त्यांच्या ९ विकेट शिल्लक आहेत. आजचा खेळ थांबला त्यावेळी सलामीवीर अखिल हेरवाडकर (नाबाद ५२) व श्रेयस अय्यर (नाबाद १२) खेळपट्टीवर होते. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली.
त्याआधी, ठाकूरचा सहकारी बलविंदर संधू (२-४३) याने उन्मुक्त चंद (१५) याला माघारी परतवत दिल्ली संघाला पहिला धक्का दिला. विल्किन मोटा(२-४७) याने गौतम गंभीरला (५) माघारी परतवले. शिवम र्श्मा (३०) व वीरेंद्र सेहवाग (४९) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. ठाकूरने सेहवागला धावबाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. ठाकूरने त्यानंतर अचूक मारा करीत मिथुन मन्हास (००) याला माघारी परतवले. त्यानंतर त्याने दिल्ली संघाच्या तळाच्या फलंदाजांना एकापाठोपाठ बाद करीत दिल्लीचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (वृत्तसंस्था)