बंगळुरू : कर्णधार गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेले दिल्लीकर सोमवारी विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गुजरातविरुद्ध भिडतील. आगामी आॅस्टे्रलिया दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये वर्णी लागलेल्या अष्टपैलू अक्षर पटेलच्या जोरावर अंतिम फेरी गाठलेला गुजरात संघही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे या सामन्यात विजेतेपदासाठी दोन तुल्यबळ संघांमध्ये एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर अटीतटीची लढत रंगेल.चार वर्षांनंतर पहिल्यांदा गुजरातने विजय हजारे स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेली असताना दुसरीकडे २०१२-१३ नंतर पहिल्यांदाच दिल्लीकरांनी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळेच दोन्ही संघ मिळालेली संधी वाया न घालवण्याच्या निर्धाराने खेळतील.
दिल्ली-गुजरात आज कॉँटे की टक्कर
By admin | Updated: December 28, 2015 03:26 IST