कोलकाता : सामना संपायला १५ मिनिटे शिल्लक असेपर्यंत अॅटलेटिको डी कोलकाता संघाचा विजय हा जवळपास निश्चित समजला जात होता, परंतु दिल्ली डायनामोसच्या पॅवेल इलिआसने निर्णायक गोल करून इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) रविवारच्या या लढतीत यजमानांना १-१ असे बरोबरीत रोखले. सॉल्ट लेक स्टेडियमवर रंगणाऱ्या या लढतीत दोन्ही संघामध्ये चुरशीचा मुकाबला पाहायला मिळाला. अटीतटीच्या या लढतीत मध्यांतरानंतर मात्र चुरस आणखी वाढली. ४९व्या मिनिटाला जोफ्रे गोंझालेज याने पेनल्टीचे रुपांतर गोलमध्ये करून अॅटलेटिकोचे खाते उघडले. ७४व्या मिनिटाला इलिआसने अप्रतिम गोल करून सामना बरोबरीत आणला. दुसऱ्या लढतीत नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने गोवाविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत सोडवली. गोवा संघाच्या आंद्रे सांतोने १७ व्या मिनिटाला गोल करुन आघाडी घेतली. ३६ व्या मिनिटाला नॉर्थइस्ट संघाला सर्जियो पर्दो उर्फ कोकने पेनेल्टी मारून बरोबरी साधली. कोकचा या स्पर्धेतील हा दुसरा गोल आहे. शेवटी हा सामना १-१ गोल बरोबरी संपला. (वृत्तसंस्था)
दिल्लीने कोलकाताला बरोबरीत रोखले
By admin | Updated: October 20, 2014 04:28 IST