शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

केकेआरपुढे दिल्लीची हार

By admin | Updated: April 29, 2017 07:03 IST

गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांची शतकी भागीदारी आणि नाथन कुल्टर नाईल याचा भेदक मारा या बळावर कोलकाता

कोलकाता : गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांची शतकी भागीदारी आणि नाथन कुल्टर नाईल याचा भेदक मारा या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने शुक्रवारी येथे दिल्ली डेअरडेव्हिल्सवर २२ चेंडू आणि सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. त्याचबरोबर केकेआर आयपीएलच्या दहाव्या पर्वात प्लेआॅफच्या उंबरठ्यावर पोहोचला.उथप्पाने ३३ चेंडूंत ५९ धावांची वादळी खेळी केली, तर कर्णधार गंभीरने ५२ चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद ७१ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी १0८ धावांची भागीदारी केली. त्यांच्या वादळी खेळीने केकेआरने विजयी लक्ष्य १६.२ षटकांत ३ बाद १६१ धावा करीत सहज गाठले. त्याचबरोबर त्यांनी सलग चौथा विजय नोंदवला.तत्पूर्वी, संजू सॅमसनच्या ३८ चेंडूंतील ६0 धावांच्या खेळीने मिळालेल्या तेजतर्रार सुरुवातीनंतरही डेअरडेव्हिल्स संघ ६ बाद १६0 धावाच रचू शकला. सॅमसनने करुण नायर (१५) याच्या साथीने सलामीसाठी ४८ आणि श्रेयस अय्यरच्या साथीने दुसऱ्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरने ३४ चेंडूंत ४७ धावा केल्या. तथापि, दिल्लीला दरम्यानच्या सात षटकांत ४२ आणि अखेरच्या चार षटकांत फक्त २0 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांच्या मजबूत धावसंख्या उभारण्याच्या अपेक्षेला जोरदार तडा बसला. सुरुवातीच्या ४ षटकांत ४१ धावा देणाऱ्या केकेआरच्या गोलंदाजांनी नंतर जोरदार पुनरागमन केले. कुल्टर नाईट त्यांचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३४ धावांत ३ गडी बाद केले.या विजयामुळे केकेआर प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचला. त्यांचे ९ सामन्यांत सात विजयासह १४ गुण असून, ते अव्वल स्थानावर कायम आहेत. दुसरीकडे डेअरडेव्हिल्स संघाचे गणित बिघडले आहे. त्यांचे सात सामन्यांत फक्त ४ गुण आहेत आणि आता आगामी सामन्यात त्यांच्यासाठी ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे.या लढतीत जवळपास केकेआरचेच वर्चस्व राहिले. सुनील नारायण (४) या वेळेस केकेआरला आधीच्या सामन्याप्रमाणे वादळी सुरुवात करून देऊ शकला नाही; परंतु गंभीर आणि उथप्पा यांनी या धक्क्याचा परिणाम होऊ दिला नाही. या दोघांनी लीलया फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये संघाची धावसंख्या ४७ पर्यंत पोहोचवली. त्यानंतर गोलंदाजीस आलेल्या अमित मिश्राच्या षटकात १४ धावा केकेआरने वसूल केल्या. उथप्पाने आक्रमक पवित्रा अवलंबताना ख्रिस मॉरिसच्या पुढच्या षटकात २ षटकार आणि एक चौकार ठोकला.उथप्पाने पॅट कमिन्सलादेखील षटकार ठोकला आणि पुन्हा पुढील षटकात कोरे अँडरसनच्या चेंडूवर एकेरी धाव घेत अवघ्या २४ चेंडूत स्वत:चे अर्धशतक पूर्ण केले. तो धावबाद झाल्यावर डेअरडेव्हिल्सला थोडा दिलासा मिळाला. उथप्पाने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. उथप्पा स्फोटक फलंदाजी करीत असताना गंभीर त्याचा फलंदाजीचा आनंद घेत होता. त्याने अँडरसनच्या चेंडूवर चौकार मारत ३९ व्या चेंडूवर त्याचे ५१ वे टी २0 तील अर्धशतक पूर्ण केले. उथप्पा परतल्यानंतर केकेआर लवकर विजयी लक्ष्य गाठण्यास आतुर दिसला. गंभीरने विजयी धाव घेतली.त्याआधी सॅमसनने आधीच्या सामन्याप्रमाणेच आक्रमक फलंदाजी केली; परंतु फिरकी गोलंदाजांसमोर तो तेवढा आक्रमक पवित्रा अवलंबू शकला नाही. त्याने सुरुवातीला कुल्टर नाईल, उमेश यादव आणि ख्रिस वोक्स यांचा समाचार घेतला; परंतु नारायण आणि कुलदीप यादवसमोर तो मोकळा खेळू शकला नाही. (वृत्तसंस्था)केकेआरचे दोन्ही फिरकी गोलंदाज नारायण आणि कुलदीप यांनी किफायती गोलंदाजी केली. नारायणने २५ धावांत १ आणि कुलदीपने चार षटकांत फक्त २७ धावा दिल्या. वोक्सने ३ षटकांत २0 धावा देत अखेरच्या दोन षटकांत फलंदाजांवर नियंत्रण ठेवले.