शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
7
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
8
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
9
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
11
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
12
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
13
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
14
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
15
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

दिल्लीकर फलंदाजांची हाराकिरी

By admin | Updated: May 1, 2017 01:46 IST

आयपीएल म्हणजे फक्त फलंदाजांची स्पर्धा आणि गोलंदाजीचा धुव्वा हेच समीकरण आतापर्यंत राहिले आहे. मात्र

आॅनलाईन लोकमतमोहाली, दि. 1 -  आयपीएल म्हणजे फक्त फलंदाजांची स्पर्धा आणि गोलंदाजीचा धुव्वा हेच समीकरण आतापर्यंत राहिले आहे. मात्र यंदाची स्पर्धा याला अपवाद ठरु पाहत आहे. फलंदाजांची हाराकिरी हे त्याचे एक कारण असले तरी गोलंदाजीतील भेदकता आणि अचुकतेला याचे श्रेय द्यावे लागेल. आधी आरसीबीने ४९ धावांची निचांक गाठला होता. आता याच स्पर्धेत दिल्लीने ६७ धावा केल्या आहेत. ही दिल्ली डेअरडेविल्सची आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या आहे. मोहालीतील पीएसए स्टेडिअमवर झालेल्या सामन्यावर पंजाब संघाने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्यातही पंजाबच्या गोलंदाजांचे वर्चस्व या सामन्यावर होते. जलदगती गोलंदाज संदीप शर्मा याने पहिल्याच षटकांत दिल्लीच्या फलंदाजीला सुरूंग लावला. त्यातून अखेरपर्यंत दिल्लीचे फलंदाज सावरलेचनाहीत.जहीर खान ऐवजी या सामन्यात दिल्लीचे कर्णधारपद युवा करुण नायरकडे होते. मात्र नायर ही जबाबदारी पेलु शकला नाही. पूर्ण सत्रात धावा करण्यासाठी झगडणाऱ्या दिल्ली डेअरडेविल्सच्या संघाची फलंदाजी या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरली. कर्णधार नायर (११) कोरे अ‍ॅँडरसन (१८) आणि कागिसो रबाडा (११) हे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठु शकले तर संपूर्ण संघच ६७ धावांवर बादझाला.या सामन्याची धक्कादायक सुरूवात संदीप शर्मा याने केली. पहिल्याच षटकांत सॅम बिलिंग्जला बाद करत त्याने पंजाबच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर त्यानेच तिसऱ्या षटकांत संजू सॅमसनला बाद करत दिल्लीला अडचणीत आणले. त्यानंतर एकापाठोपाठ फलंदाज बाद होत राहिले. पंजाबच्या गोलंदाजांनी या सामन्यात अचुक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. दिल्लीच्या फलंदाजांपैकी नायर वगळता एकालाही १०० च्या स्ट्राईक रेटने धावा करता आल्या नाहीत. ६८ धावांचे सोपे लक्ष्य पार करणे पंजाबला कठीण नव्हते. स्फोटक मार्टिन गुप्टील याने या परिस्थितीचा फायदा घेतला आणि २७ चेंडूत ५० धावा कुटल्या. त्यासोबतच आमला याने पडझड होऊ न देता विजय मिळवून दिला.