शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोलंदाज ठरणार निर्णायक

By admin | Updated: May 30, 2017 00:57 IST

काही दिवसांमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. भारत या स्पर्धेत गतविजेता असून पहिल्याच सराव सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवले

काही दिवसांमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. भारत या स्पर्धेत गतविजेता असून पहिल्याच सराव सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवले. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे जरी भारताने विजय मिळवला असला तरी, माझ्या मते हा चांगला विजय ठरला. कारण, एक तर हा सराव सामना होता, त्यात न्यूझीलंडसारख्या संघाला १८९ धावांमध्ये बाद करणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. भारत विजयापासून ६० धावा दूर असताना पावसाने हजेरी लावली आणि जास्त बळीही गमावले नव्हते. सर्वांत चांगली बाब म्हणजे विराट कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावले.कोहलीला आॅस्टे्रलियाविरुद्धच्या मालिकेत फार काही चमक दाखवता आली नव्हती. तसेच, त्यानंतर झालेल्या आयपीएलमध्येही लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. अशा घडामोडीनंतर पहिल्याच सामन्यात जर कोहली धावा काढत असेल, तर स्वत:सह संघाचाही आत्मविश्वास वाढतो. तसेच कोहलीसारखा मोठा खेळाडू फॉर्ममध्ये आल्यानंतर प्रतिस्पर्धी संघावर खूप मोठा परिणाम होतो. पण एकूणच कामगिरी पाहिल्यास सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, भारताची गोलंदाजी जबरदस्त झाली. ५ वेगवान गोलंदाज, २ फिरकी गोलंदाज असा ताफा असलेल्या भारतीय संघाचे जवळपास सर्वच गोलंदाज यशस्वी ठरले. महंमद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार या प्रमुख गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे गोलंदाज भारतासाठी खूप निर्णायक ठरेल, असे मला वाटते.गोलंदाजी यासाठी निर्णायक ठरेल, कारण विदेशात जिंकलेल्या गेल्या तीन एकदिवसीय विजेतेपदांची कामगिरी पाहिल्यास कळेल, की गोलंदाजांमुळे टीम इंडिया यशस्वी झाली आहे. १९८३ चा विश्वचषक कपिलदेवच्या नेतृत्वामध्ये जिंकला, तेव्हा सर्वांना कपिलच्या नाबाद १७५ धावांची खेळी आठवते. पण आपण हे विसरतो, की अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजला ४० धावांनी नमवले. १८३ सारख्या छोट्या धावसंख्येचे भारतीयांनी यशस्वी संरक्षण केले होते. गोलंदाजांनी तेथे यश मिळवले होते. मदनलाल, कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ, रॉजर बिन्नी यांसारख्या गोलंदाजांनी बाजी मारली.यानंतर, १९८५ मध्ये वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये जर तुम्ही पाहिले तर कळेल, तिथेही गोलंदाज चमकले होते. विश्वचषकविजेत्या गोलंदाजांसोबत चेतन शर्मा, शिवरामकृष्णन, रवी शास्त्री यांची भर पडली होती. या गोलंदाजांच्या जोरावर भारताने अंतिम सामना जिंकला होता. यानंतर २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील भारताने गोलंदाजांच्या जोरावरच जिंकली होती. ५ सामन्यांत ५० पैकी ४५ बळी मिळवण्यात भारताला यश आले होते. यावरुनच गोलंदाजांचे यश लक्षात येते. कारण, विदेशी वातावरण असे असते जेथे गोलंदाजांना खूप मदत मिळते. त्यामुळे गोलंदाजीमध्ये विविधता, चांगले पर्याय असणे खूप महत्त्वाचे ठरते. तसेच, गोलंदाजांची कामगिरीही चांगली होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मला वाटते, या वेळी निवडकर्त्यांनी खूप चांगले काम केले आहे. सध्याच्या भारतीय संघात गोलंदाजीसाठी अनेक पर्याय असून आपले गोलंदाज चांगल्या लयीमध्ये आहेत.

- अयाझ मेमन -(संपादकीय सल्लागार)