शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

गतविजेत्या शारापोव्हाचे पॅक-अप!

By admin | Updated: June 2, 2015 01:03 IST

टेनिससुंदरी आणि गतविजेत्या रशियाच्या मारिया शारापोव्हा हिच्यावर चौथ्या फेरीत चेक गणराज्यच्या लुसी सफारोव्हाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

पॅरिस : टेनिससुंदरी आणि गतविजेत्या रशियाच्या मारिया शारापोव्हा हिच्यावर चौथ्या फेरीत चेक गणराज्यच्या लुसी सफारोव्हाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. याबरोबरच तिला प्रतिष्ठेच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. दुसरीकडे, दुसऱ्या मानांकित रॉजर फेडररने पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गतविजेत्या शारापोव्हाला चेक गणराज्यच्या लुसी सफारोव्हाने सरळ सेटमध्ये म्हणजे ७-६, ६-४ ने पराभूत केले. हा स्पर्धेतील मोठा उलटफेर ठरला. सफारोव्हा हिने आता पहिल्यांदाच फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे. आता तिचा सामना स्पेनच्या गारबाइन मुगुरुजा हिच्याविरुद्ध होईल. याआधी, २०१२ आणि २०१४ ची चॅम्पियन आणि २०१३ ची उपविजेती असलेल्या मारिया शारापोव्हाने कालचा उपउपांत्यपूर्व फेरीतील सामना पावसामुळे पुढे म्हणजे आजवर ढकलला होता. आज सामन्यात मारिया शारापोव्हाने सुरुवातीपासूनच चुका केल्या. त्या तिला महागड्या ठरल्या. शारापोव्हाने पहिल्या सेटमध्ये दुसरीच सर्व्हिस गमावली. त्यानंतर मात्र तिने प्रतिस्पर्धी खेळाडूची सर्व्हिस भेदली. सफारोव्हाने पहिला सेट टायब्रेकरवर जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये या दोन्ही खेळाडूंनी एकमेकांविरुद्धची सर्व्हिस मोडून काढली. त्यानंतर शारापोव्हा सामना वाचविण्यासाठी धडपडत होती. मारियाने पहिला मॅच पॉइंट वाचवला; मात्र सफारोव्हाने दुसरा मॅच पॉइंट जिंकत सामना खिशात घातला. आठव्या मानांकित वावरिंकाने१२ व्या मानांकित जाईल्स साइमनचा पराभव केला. हा त्याचा रॉलंड गॅरोस मैदानावरील ४० वा विजय आहे. अन्य सामन्यात, २०१३ चा उपविजेता ठरलेल्या फेररने नवव्या मानांकित सिलीच याचा ६-२, ६-२, ६-४ ने पराभव केला. आता पुढील फेरीत त्याची लढत तिसऱ्या मानांकित ब्रिटनच्या अ‍ॅँडी मरे आणि फ्रान्सचा बिनमानांकित जेरेमी चार्डी यांच्यातील विजेत्याशी होईल. (वृत्तसंस्था)