शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
9
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
10
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
11
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
12
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
13
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
14
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
15
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
16
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
17
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
18
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
19
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
20
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

दीपक, रवी, सत्येंद्रचे लक्ष पदकावर

By admin | Updated: May 19, 2017 02:52 IST

भारताचे अव्वल नेमबाज दीपक कुमार, रवी कुमार आणि सत्येंद्र सिंह उद्यापासून (शुक्रवार) सुरू होणाऱ्या आयसीसीएफ जागतिक रायफल व पिस्टल नेमबाजी स्पर्धेत

म्युनिच : भारताचे अव्वल नेमबाज दीपक कुमार, रवी कुमार आणि सत्येंद्र सिंह उद्यापासून (शुक्रवार) सुरू होणाऱ्या आयसीसीएफ जागतिक रायफल व पिस्टल नेमबाजी स्पर्धेत पहिल्या दिवशी आपापल्या गटात अव्वल स्थान संपादन करून पदके जिंकण्याच्या इर्षेने खेळतील. पुरुष गटात १० मीटर एअर रायफल प्रकारापासून या स्पर्धेची सुरुवात होईल. या स्पर्धेत ५९ देशांचे एकूण १२९ नेमबाज पहिल्या ८ क्रमांकांत आपले स्थान निश्चित करण्यासाठी अचूक लक्ष्य साधण्यासाठी प्रयत्नशील असतील. महिलांच्या गटात १० मीटर एअर रायफलमध्ये ५५ देशांच्या एकूण १२२ नेमबाज आपले कौशल्य पणाला लावतील. या स्पर्धेत रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारणारे आठपैकी पाच नेमबाज स्वत:चे कौशल्य पणाला लावतील. यांमध्ये युक्रेनचा रौप्यपदकविजेता सेरहिय कुलिस आणि रशियाचा कांस्यपदकविजेता व्लादिमीर मासलेनिकोव्हचासुद्धा समावेश आहे. महिला गटात या वर्षी नवी दिल्ली विश्व चषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेली भारताची पूजा घाटकर, आॅलिम्पियन अपूर्वी चंदेला आणि युवा नेमबाज मेघना सजनार यासुद्धा आपापल्या प्रकारात अचूक लक्ष्य साधण्याचा प्रयत्न करतील. रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेती अमेरिकेची वर्जिनिया थे्रसर आॅलिम्पिक स्पर्धेच्या विश्रांतीनंतर प्रथम स्पर्धेत सहभागी होणार आहे. पहिल्या दिवशी पुरुष गटात ५० मीटर पिस्टल स्पर्धेचा एलिमिनेशन राऊंडसुद्धा होणार आहे. यामध्ये भारताचे जितू रॉय, प्रकाश नानजप्पा आणि अमनप्रीत सिंह सहभागी होतील. जगभरातील ८० राष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे सदस्यदेशांचे ७५०हून अधिक नेमबाज या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. (वृत्तसंस्था)