शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
2
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
3
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
5
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
6
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
7
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
8
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
9
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
10
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
11
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
12
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
13
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
14
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
15
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
16
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
17
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
18
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
19
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
20
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
Daily Top 2Weekly Top 5

दीपा, जितूसोबत साक्षीलाही खेलरत्न!

By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून एका रात्रीत स्टार बनलेली हरियाणातील रोहतकची महिला मल्ल साक्षी मलिक ही २९ आॅगस्ट रोजी खेलरत्नची मानकरी ठरेल.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 : रिओ आॅलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून एका रात्रीत स्टार बनलेली हरियाणातील रोहतकची महिला मल्ल साक्षी मलिक ही २९ आॅगस्ट रोजी खेलरत्नची मानकरी ठरेल. राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार निवडसमितीने देशाच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी जिम्नॅस्ट दीपा कर्माकर तसेच नेमबाज जितू राय यांच्यासोबतच साक्षीच्या नावाची श्फिारस केल्याचे समजते.

काल समितीने बैठकीनंतर पदक विजेत्यांसाठी पुरस्कार देण्याचा विचार केला होता. साक्षीने यंदा देशाला पहिले पदक मिळवून दिल्याने खेलरत्नची ती सर्वांत मोठी दावेदार बनली. आॅलिम्पिक वर्षांत एकापेक्षा अनेक खेळाडूंना खेलरत्न दिले जाऊ शकेल, अशी सरकारने आधीच घोषणा केली होती.

२००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकनंतर २००९ मध्ये आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार, बॉक्सर विजेंदरसिंग आणि पाच वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम.सी. मेरिकोम यांना एकाचवेळी खेलरत्नने सन्मानित करण्यात आले. २०१२ च्या लंडनआॅलिम्पिकनंतर मल्ल योगेश्वर दत्त आणि नेमबाज विजय कुमार यांना संयुक्तपणे खेलरत्न देण्यात आला. यंदा पुन्हा तीन किंवा त्याहून अधिक खेळाडूंना एकाचवेळी खेलरत्न मिळणार आहे. पुरस्कार निवड समितीनेसाक्षीच्या नावाची अद्याप घोषणा केली नसली तरी लवकरच ती केली जाईल, असेसंकेत मिळाले आहेत.

५२ वर्षांत पहिल्यांदा भारतीय जिम्नॅस्ट म्हणून रिओत उतरलेल्या त्रिपुराच्या २३ वर्षांच्या दीपाने वॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरीसह चौथे स्थान घेतले. विश्व रँकिंगमध्ये तिसरा असलेल्या सेनादलाच्या २९ वर्षांच्या जितूने दहा मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम फेरीत आठवे स्थान मिळविले.

खेलरत्नसाठी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याचे नाव देखील होते. पण आॅलिम्पिकमुळे त्याची दावेदारी कमकुवत बनली. याशिवाय टिंटू लुका, अनिर्बान लाहिरी, विकास गौडा, मिताली राज आणि दीपिका पल्लीकल हिच्यासह दहा खेळाडूंनी आपापल्या महासंघांकडून अर्ज पाठविले होते