शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘एआयबीए’चा यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घाईचा - बीएफआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 03:51 IST

भारतीय मुष्टियुद्ध महासंघाने (बीएफआय) म्हटले की, ‘एआयबीएने घाईघाईमध्ये आपला निर्णय घेतला.’

नवी दिल्ली : भारतामध्ये २०२१ साली पुरुषांची जागतिक अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धा होणार होती. मात्र भारताच्या यजमानपदाचे हक्क आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेने (एआयबीए) काढून घेतले. यानंतर भारतीय मुष्टियुद्ध महासंघाने (बीएफआय) म्हटले की, ‘एआयबीएने घाईघाईमध्ये आपला निर्णय घेतला.’‘एआयबीए’ने सोमवारी रात्री पत्रक जाहीर करत सांगितले की, ‘यजमानपदाचे शुल्क न भरल्याने आता ही अजिंक्यपद स्पर्धा भारताऐवजी सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे आयोजित करण्यात येईल.’ २०१७ साली भारताला या स्पर्धेचे यजमानपद सोपविण्यात आले होते. ‘बीएफआय’ने शुल्क भरण्यास उशीर झाल्याचे मान्य केले आहे. त्याच वेळी पैसे कोणाच्या खात्यात भरायचे हा मुद्दा सोडवण्यात ‘एआयबीए’ला यश न आल्याने ही अडचण निर्माण झाली, असेही बीएफआयने स्पष्ट केले.सुमारे ४० लाख डॉलरची रक्कम गेल्या वर्षी २ डिसेंबरला भरायची होती. भारतात पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन होणार होते. ‘एआयबीए’ने एका निवेदनात म्हटले की, ‘यजमान शहर करार नियमांनुसार भारताने यजमानपद शुल्क न भरल्याने ‘एआयबीए’ने हा करार मोडला. आता हा करार रद्द झाल्याने भारताला ५०० डॉलरचा दंड भरावा लागेल.’ आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘एआयबीए’ला निलंबित केले आहे.‘बीएफआय’ने म्हटले आहे की, ‘लुसाने येथे ‘एआयबीए’चे खाते बंद करण्यात आले आहे. सर्बियामध्ये एका खात्याद्वारे त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करायचे होते. सर्बिया ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या (एफटीएफ देश) काळ्या यादीमध्ये येत असल्याने भारतीय बँक तिथे पैसे पाठवत नाही. एआयबीए ही समस्या सोडवू शकले नाही. आमच्याशी चर्चा न करताच घाईमध्ये ‘एआयबीए’ने आपला निर्णय घेतला. आमच्यावर दंड लावण्यात आल्याचे आश्चर्य वाटते. या समस्येचा आपण मिळून तोडगा काढू आणि आशा आहे की, भविष्यात या स्पर्धेचे आम्ही यजमानपद सांभाळू.’ (वृत्तसंस्था)