शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरिताविरुद्धचा निर्णय निराशाजनक ठरला, भारतीय प्रशिक्षक शिव सिंग यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 04:35 IST

भारताच्या साविटी बुराला (७५ किलो) येथे सुरू असलेल्या दहाव्या एआयबीए महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये सोमवारी एलबिएटा वोजसिकविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.

नवी दिल्ली : भारताच्या साविटी बुराला (७५ किलो) येथे सुरू असलेल्या दहाव्या एआयबीए महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये सोमवारी एलबिएटा वोजसिकविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे यजमान देशाच्या दुसऱ्या बॉक्सरला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. रविवारी एल. सरिता देवीला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दोन्ही लढतींमध्ये निकाल सर्वसंमतीने झाले नाही. दोन्ही खेळाडूंना २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही खेळाडू रिंगमध्ये पडल्यानंतर रेफरीने काऊंटिंगला सुरुवात केली होती.साविटीने पराभवानंतर प्रसारमाध्यमांसोबत चर्चा केली नाही. प्रशिक्षक शिव सिंग म्हणाले, ‘प्रतिस्पर्धी बॉक्सर तिचा ठोसा योग्य लागल्याचे दाखवित होती. तसेच ती धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न करीत होती. गुण परिक्षकांच्या निर्णयानंतर मिळतात.’ सिंग पुढे म्हणाले, ‘दोघींमध्ये एक समान बाब होती. ज्यावेळी सरिताची काऊंटिंग होत होती त्यावेळी प्रतिस्पर्धी खेळाडू तिला सावरण्यासाठी आली, पण जर ठोसा लागला असता तर ती पुढे आली नसती. तुम्हालाही दिसले असेल की तिचा ठोसा लागला नसतानाही रेफरीने गणना सुरू केली होती.’ (वृत्तसंस्था)‘बॉक्सिंगमध्ये निष्पक्ष स्कोअरिंग होते. त्याचे आकलन केले तर तुमच्या लक्षात येईल की जजेसचे गुण बहाल करण्याचे निकष असतात. त्यात अनेकदा परिक्षक गुण देताना दडपणाखाली येतो. सरिताची लढत चुरशीची होती. दोन्ही खेळाडूंबाबत एक बाब समान होती. दोन्ही खेळाडू पंच लागल्यामुळे पडले नव्हते. तेव्हाही काऊंटिंग झाले आणि आजही तेच झाले.’-शिव सिंग

टॅग्स :boxingबॉक्सिंग