लेक्सिंगटन : आॅलिम्पिक जलद धावपटू टायसन गे याची पंधरावर्षीय मुलीची गळ््यात गोळी लागल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी एका युवकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की केंटुकी मेडिकल सेंटर विद्यापीठात २१ वर्षीय दवोंता मिडिलब्रूक्सने केलेल्या गोळीबारात ट्रिनिटी गे हिचा गळ््यामध्ये गोळी घुसल्याने मृत्यू झाला. दवोंतोला अटक करण्यात आली असून त्याने विनाकारण गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच त्याच्याकडून अधिक माहिती घेण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
धावपटू टायसन गेच्या मुलीचा गोळी लागल्याने मृत्यू
By admin | Updated: October 18, 2016 04:24 IST