शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

' दंगल गर्ल्स ' फोगट भगिनींना राष्ट्रीय कुस्ती शिबीरामधून डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 18:01 IST

आपल्यावर आधारीत सिनेमा आल्यावर फोगट भगिनींना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांचे पाय जमिनीवर राहत नसल्याचे बऱ्याच जणांनी म्हटले.

ठळक मुद्देयावेळी जर त्यांना राष्ट्रीय शिबीरामधून डच्चू देण्यात आल्यामुळे त्यांना आगामी आशियाई स्पर्धेत बहुतेक खेळता येणार नाही.

नवी दिल्ली : ज्यांच्यावर बॉलीवूडवमधील एक सिनेमा बनवण्यात आला, आमीर खानने त्या सिनेमात काम केलं, अशा' दंगल गर्ल्स ' फोगट भगिनींना राष्ट्रीय शिबीरामधून डच्चू देण्यात आला आहे.

आपल्यावर आधारीत सिनेमा आल्यावर फोगट भगिनींना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांचे पाय जमिनीवर राहत नसल्याचे बऱ्याच जणांनी म्हटले. कुस्ती प्रशासनाला काही वेळा या भगिनींनी व्यवस्थित उत्तरेगी दिली नव्हती. त्यामुळे बेशिस्त फोगट भगिनींना राष्ट्रीय शिबीरामध्ये सामील न करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे.

फोगट भगिनींचे भविष्यात काय होऊ शकते...राष्ट्रीय शिबीरामधून भारताचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीचे संघ निवडले जातात. त्यामुळे यावेळी जर त्यांना राष्ट्रीय शिबीरामधून डच्चू देण्यात आल्यामुळे त्यांना आगामी आशियाई स्पर्धेत बहुतेक खेळता येणार नाही. त्यांचा बेशिस्तपणा असाच कायम राहीला तर त्यांना मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांनाही मुकावे लागेल.

महासंघाच्या अध्यक्षांचे म्हणणे काय...भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी सांगितले की, " जेव्हा एखाद्या खेळाडूची शिबीरासाठी निवड केली जाते तेव्हा त्यांना आपली उपस्थिती कळवायची असते. यासाठी खेळाडूंना तीन दिवसांचा अवधी दिला जातो. या तीन दिवसांमध्ये फोगट भगिनींनी महासंघाला आपल्या अनुपस्थितीबाबत काहीही कळवले नाही. त्यांनी आपल्या प्रशिक्षकांनाही याबाबत काही सांगितले नाही. त्यामुळे त्यांची शिबीरासाठी निवड केली गेली नाही. "

टॅग्स :Sportsक्रीडा