शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

डी. गुकेश संयुक्त दुसऱ्या स्थानावर; प्रज्ञानानंदा आणि विदित गुजराती पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 7:09 AM

प्रज्ञानानंदाला अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा आणि गुजरातीला रशियाच्या इयान नेपोम्नियाश्चिने पराभूत केले.

टोरंटो : भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या ११व्या फेरीत अग्रमानांकित फॅबियानो कारूआना याच्याविरुद्ध ड्राॅनंतर संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. तर भारताच्या आर. प्रज्ञानानंदा आणि विदित गुजराती यांना पराभवाचा सामना करावा लागला.

प्रज्ञानानंदाला अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा आणि गुजरातीला रशियाच्या इयान नेपोम्नियाश्चिने पराभूत केले. अन्य सामन्यांत फ्रान्सच्या फिरोजा अलीरजाने अझरबैजानच्या निजात अबासोव याला पराभूत केले. स्पर्धेत आता तीन फेऱ्या शिल्लक आहेत आणि नेपोम्नियाश्चि सलग तिसऱ्यांदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार ठरत आहे. रशियावर बंदी घालण्यात आल्यामुळे तो फिडेच्या ध्वजाखाली खेळत आहे. त्याने ११ पैकी सात गुण मिळवून आघाडी घेतली आहे. कारूआना, नाकामुरा आणि गुकेश त्याच्यापेक्षा अर्ध्या गुणाने पिछाडीवर आहे. प्रज्ञानानंदाचे ५.५ आणि गुजरातीचे पाच गुण आहेत. 

महिला गटात चीनच्या झोंग्यी तान हिला एकेरी आघाडी मिळाली आहे. तर चीनचीच टी लेइ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या आर. वैशालीने अग्रमानांकित रशियाच्या अलेक्झांड्रा गोरियाश्किना हिला पराभूत केले. तर कोनेरू हम्पीने बल्गेरियाच्या नूरगुल सलीमोवा हिला पराभूत केले.

टॅग्स :Chessबुद्धीबळ