शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

सिरिल वर्माचे ‘चंदेरी’ यश

By admin | Updated: November 17, 2015 03:09 IST

भारताचा युवा बॅडमिंटनपटू सिरिल वर्मा याने चमकदार खेळाचे प्रदर्शन करताना वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात

लीमा (पेरु) : भारताचा युवा बॅडमिंटनपटू सिरिल वर्मा याने चमकदार खेळाचे प्रदर्शन करताना वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सिरिलला चिनी तैपईच्या चिया हुंग ल्यूविरुद्ध १-२ असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ५० मिनिटांच्या तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात सिरिलने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना विजेतेपदासाठी ल्यूला चांगलेच झुंजवले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करताना सामना चांगलाच रंगतदार केला. या वेळी सिरिलने अंतिम क्षणी खेळ उंचावताना २१-१७ अशी बाजी मारत सामन्यात १-० अशी आश्वासक सुरुवात केली. मात्र यानंतर ल्यूने केवळ पुनरागमनच केले नाही, तर एकहाती वर्चस्व राखताना सिरिलला पुन्हा डोके वर काढण्याची एकही संधी दिली नाही. या वेळी ल्यूने धडाकेबाज खेळ करताना सलग दोन सेटमध्ये सहज बाजी मारून १७-२१, २१-१०, २१-७ अशा विजयासह सुवर्णपदक निश्चित केले. १५ वर्षीय सिरिल पुल्लेला गोपीचंद अ‍ॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. (वृत्तसंस्था)याआधी गतमहिन्यात सिरिलला दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होता आले नव्हते. तरीही निराश न होता त्याने स्वत:ला सिद्ध केले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) आदेशानुसार त्याला वय पडताळणी चाचणीला सामोरे जावे लागले होते. या वेळी राम मनोहर लोहियाच्या डॉक्टरांनी सिरिलचे वय अधिक असल्याचे घोषित केल्याने त्याला आशियाई ज्युनियर अंडर १७ व अंडर १५ या स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. मात्र नंतर एम्सच्या डॉक्टरांनी सिरिलच्या वयाबाबतीत योग्य निर्णय दिला.भारतीय बॅडमिंटनचा उगवता तारावर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप रौप्यपदकासह सिरिल देशातील अव्वल बॅडमिंटनपटूंच्या पंक्तीत बसला. याआधी या स्पर्धेत फुलराणी सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, आरएमव्ही गुरुसाईदत्त, एचएस प्रणय आणि समीर वर्मा यांच्यासारख्या अव्वल राष्ट्रीय खेळाडूंनी पदक पटकावले आहे. त्यामुळे सिरिलकडे भारतीय बॅडमिंटनमधील उगवता तारा म्हणून पाहण्यात येत आहे.सिरिलने या स्पर्धेत नील वेन्सत्रा (नेदरलँड), थॉमस बारेस (फ्रान्स), कंताफोन वांगचारोन (थायलंड), अँडर्स अँटोसन (डेन्मार्क), सतीशरथन आर. (मलेशिया) आणि अदुलराच नामकुल (थायलंड) या खेळाडूंना नमवून अंतिम फेरीत धडक मारली होती.