शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाबाबत उत्सुकता

By admin | Updated: June 18, 2017 03:12 IST

साखळी फेरीत सलामी लढतीत भारतीय संघाने ज्या पाक संघाचा धुव्वा उडवला त्याच संघाविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत गाठ पडेल, याचा कुणी विचारही केला नसेल.

- सुनील गावसकर लिहितात...साखळी फेरीत सलामी लढतीत भारतीय संघाने ज्या पाक संघाचा धुव्वा उडवला त्याच संघाविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत गाठ पडेल, याचा कुणी विचारही केला नसेल. याचे मुख्य कारण आहे पाकचा कर्णधार सरफराज अहमदचे शानदार नेतृत्व आणि भारताचा अपवाद वगळता अन्य संघांविरुद्ध चमकदार कामगिरी. भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानचे खेळाडू अधिक भयभीत असतात, पण अंतिम लढतीत निश्चितच सरफराजच्या नेतृत्वाखाली एक वेगळाच पाक संघ बघायला मिळू शकतो. सलामीला पाक संघात फखर जमानसारखा फलंदाज आहे. तो पहिल्या १० षटकांत प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणू शकतो. प्रतिस्पर्धी गोलंदाजांविरुद्ध खेळताना फखर निर्भीड असतो. दुसऱ्या टोकावर त्याला अझहर अलीची मिळणारी साथ सलामीच्या गोलंदाजांसाठी अडचणीचे कारण ठरू शकते. या दोघांचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांना विशेष छाप सोडता आलेली नाही. दरम्यान, बाबर आजमने टप्प्याटप्प्यात झलक दाखविली आहे. त्यानंतर अनुभवी शोएब मलिक व सरफराज यांचा क्रमांक येतो. पाकच्या फलंदाजीमध्ये हे खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावतात. यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर पाकने श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत सरशी साधत उपांत्य फेरी गाठली होती. सरफराजने आपल्या नेतृत्वाने प्रभावित केले आहे. गोलंदाजीमध्ये योग्य बदल आणि मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंचा योग्य वापर पाक संघाच्या यशात निर्णायक ठरला आहे. मोहम्मद आमिर अंतिम लढतीत खेळण्याची शक्यता आहे. आमिर जुनेद खान व हसन अलीच्या साथीने नव्या चेंडूने गोलंदाजीचा भार सांभाळेल. भारतीय सलामीवीर शानदार फॉर्मात आहेत. रोहितने शतकी खेळी करीत आपले महत्त्व पटवून दिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसोबत धवनचे विशेष प्रेम असल्याचे दिसून येते. उपांत्य फेरीत कोहलीच्या शानदार खेळीनंतर उर्वरित फलंदाजांना विशेष काही करण्याची फारच कमी संधी मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये आक्रमकता येणे आवश्यक आहे. कोहलीने चपळ क्षेत्ररक्षकांना सीमारेषेवर तैनात करायला हवे. त्यामुळे चौकारांवर नियंत्रण राखता येईल. भारतीय संघात बदल करण्याची शक्यता दिसत नाही. जर रविवारी सकाळी ढगाळ वातावरण असेल तर अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी देण्याबाबत विचार करता येईल. भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. पण काही खेळाडू मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करतात, काही अपयशी ठरतात. त्यामुळे चमकदार कामगिरी करीत कुठला संघ जेतेपद पटकावतो, याबाबत उत्सुकता आहे. (पीएमजी)