शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 03:03 IST

(ता. मुळशी) झालेल्या ६१ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून नामवंत मल्लांबरोबरच राजकीय नेत्यांची मांदियाळी राहिली.

प्रदीप पाटील भूगाव : (ता. मुळशी) झालेल्या ६१ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून नामवंत मल्लांबरोबरच राजकीय नेत्यांची मांदियाळी राहिली.सलग चार दिवस चाललेल्या विविध वजन गटातील कुस्त्यांचा समारोप होणार असल्यामुळे अंतिम लढतीसाठी मागील सलग तीनवर्षीचा महाराष्ट्र केसरी विजेचा विजय चौधरी, हिंद केसरी विजेता योगेश बुचडे यांच्यासह अनेक नामवंत मल्ल आज उपस्थित होते. यामध्ये माजी कृषिमंत्री व महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री गिरीश बापट,आमदार संग्राम थोपटे, माजी खासदार विदुरा नवले, माजी खासदार अशोक मोहोळ, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, रामराजे निंबाळकर, अभिनेते मोहन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी तांगडे, संदीप भोंडवे, स्वस्तिक चोंधे, राहुल शेडगे, अनिल पवार आदी उपस्थित होते. तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे हेही यावेळी उपस्थित होते.याशिवाय मागील तीन दिवसात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. प्रास्ताविक कुस्ती स्पर्धेचे मुख्य आयोजक व जि.प. माजी गटनेते शांताराम इंगवले यांनी केले. महाराष्ट्र केसरी विजेत्या अभिजित कटके याला रोख १ लाख रुपये व जीप गाडी तसेच मानाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेत्या किरण भगतला रोख पन्नास हजार रुपये व बुलेट गाडी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.